कामांचे योग्य नियोजन करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2017 12:22 AM2017-10-13T00:22:48+5:302017-10-13T00:23:00+5:30

आरमोरी शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे नगर पंचायतीला प्राप्त होणारा विविध स्वरूपाचा निधी आरमोरी शहरातील विकास कामांमध्ये खर्च करावा,

 Proper planning | कामांचे योग्य नियोजन करा

कामांचे योग्य नियोजन करा

Next
ठळक मुद्देमुख्याधिकाºयांना निवेदन : आरमोरीत भाजप कार्यकर्त्यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : आरमोरी शहराच्या विकासाकरिता राज्य शासनाने पाच कोटी रूपयांचा निधी मंजूर केला आहे. त्याचप्रमाणे नगर पंचायतीला प्राप्त होणारा विविध स्वरूपाचा निधी आरमोरी शहरातील विकास कामांमध्ये खर्च करावा, याकरिता योग्य नियोजन व विनियोग करताना शहराचा समतोल विकास व्हावा या दृष्टीकोनातून संपूर्ण वॉर्डात प्रशासनाने वॉर्डसभा घ्यावी, वॉर्डसभेतील नागरिकांकडून वॉर्डातील प्रमुख व मूलभूत समस्या जाणून त्यानुसार शहर विकास आराखडा तयार करावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टी शहर शाखेच्या वतीने नगर परिषदेच्या मुख्याधिकाºयांकडे गुरूवारी करण्यात आली.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आरमोरीतील पाणीपुरवठा फार जुनी असल्याने ती बदलून नवीन पाईपलाईन टाकण्यात यावी, नगर पंचायतद्वारे एलईडीची व्यवस्था करण्यात आली. परंतु योग्य प्रकारे प्रकाश पडत नसल्याने दुसºया बाजूला अंधारच असतो. याकरिता प्रत्येक खांबावर दोन एलईडी गरज पडल्यास तीन एलईडी लावावे, विशिष्ट चौकांमध्ये हॉयमास्ट लावावे, प्रत्येक प्रमुख चौकात याची व्यवस्था करावी, नाली उपसा केल्यानंतर त्यातून निघालेल्या गाळाची विल्हेवाट लावावी, शहरातील प्रत्येक चौकात मूत्रिघर व सार्वजनिक शौचालयाची व्यवस्था करावी, स्वच्छ भारत अभियानांतर्गत शौचालय बांधकाम योजनेंतर्गत गरजूंना लाभ द्यावा, अनेक लाभार्थ्यांना शौचालयाचा लाभ मिळाला नाही याची चौकशी करावी, अशी मागणी करण्यात आली.
निवेदन देताना भारत बावनथडे, सुनील नंदनवार, प्रदीप हजारे, प्रमोद संगमवार, महादेव राऊत, चांगदेव काळबांधे, राजू जराते, प्रमोद पेंदाम, भोलानाथ मेश्राम, विश्वनाथ कुकुडकर, प्रणव गजापुरे, कुंदा मेश्राम, शर्मिला मसराम, रेखा कुकडकर, अनिल नन्नावरे, पुंडलिक दहीकर, अमित जौंजाळकर, पिंकू बोडे, रामदास ढोक, कृष्णा कांबळे, भाष्कर खोब्रागडे, सुरेश वागघरे, डोमा मंगरे, दीपक खोब्रागडे हजर होते.

Web Title:  Proper planning

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.