महापुरूषांच्या विचारांनीच मानव जातीचा उत्कर्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2021 04:37 AM2021-01-23T04:37:21+5:302021-01-23T04:37:21+5:30
माळी समाज संघटना माेहझरी तथा गाववासीयांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रबाेधन कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत हाेते. याप्रसंगी अशाेक मांदाळे यांनी ...
माळी समाज संघटना माेहझरी तथा गाववासीयांच्या वतीने घेण्यात आलेल्या प्रबाेधन कार्यक्रमात ते मार्गदर्शन करीत हाेते. याप्रसंगी अशाेक मांदाळे यांनी समाजबांधवांनी आता महात्मा फुले व सावित्रीबाई फुले यांना डाेक्यावर घेण्यापेक्षा डाेक्यात घेतले पाहिजे. तेव्हाच संपूर्ण समाजाची उन्नती हाेऊ शकते, असे प्रतिपादन केले. डाॅ. यशवंत मनाेहर यांनी विदर्भ साहित्य संघाचा पुरस्कार एका कारणावरून नाकारला. ही बाब संपूर्ण फुले-शाहू-आंबेडकरी चळवळीच्या व विचारांच्या व्यक्तीकरिता एक उदात्त संदेश देणारी घटना आहे, असे मत प्राचार्य डी. के. मेश्राम यांनी व्यक्त केले. विद्येची खरी देवता सावित्रीबाई फुले आहेत, असे प्रतिपादन भीमराव पात्रीकर यांनी अध्यक्षीय भाषणानातून व्यक्त करीत महिलांनी सावित्रीबाई फुले, महात्मा फुले व डाॅ. आंबेडकर यांच्या चरित्राची पुस्तके संक्रातीचा वाण म्हणून वाटावे, असे आवाहन केले. सुरूवातीला महापुरूषांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी किसनराव खाेब्रागडे शिक्षण संस्थेचे भाग्यवान खाेब्रागडे, प्राचार्य विजय झाेडे, जि. प. सदस्य संपत आळे, सेवानिवृत्त मुख्याध्यापक दादाजी गुरनुले, माजी सरपंच शालिकराम माेहुर्ले, सुखदेव जेंगठे उपस्थित हाेते. प्रास्ताविक विजय गुरनुले यांनी केले. संचालन साेपान चाटाळे तर आभार नंदकिशाेर वाडगुरे यांनी मानले. यावेळी समाजबांधव उपस्थित हाेते.