रबी पिकांचे अळींपासून संरक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 12:18 AM2017-11-11T00:18:51+5:302017-11-11T00:19:03+5:30
रबी हंगामात हरभरा, तूर, कपासी आदी पिके महत्त्वपूर्ण मानले जातात. या पिकांवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याकरिता शेतकºयांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन बंदोबस्त करावा,
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : रबी हंगामात हरभरा, तूर, कपासी आदी पिके महत्त्वपूर्ण मानले जातात. या पिकांवर विविध अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. या अळ्यांचे एकात्मिक व्यवस्थापन करण्याकरिता शेतकºयांनी कृषी विभागाचा सल्ला घेऊन बंदोबस्त करावा, असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राच्या कीटकशास्त्र विभागाने केले आहे.
हरभरा पिकाचे घाटेअळीपासून संरक्षण करण्याकरिता एकात्मिक व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. उन्हाळ्यात जमिनीची नांगरणी केल्यास किडींचे कोष पक्षी वेचून खातात तसेच उन्हामुळे ते मरतात. गहू, मसूर, मोहरी, जवस आदी आंतर पीक घेतल्यास घाटेअळीचा प्रादुर्भाव कमी होण्यास मदत होते. तसेच शत्रू कीटकांचाही वापर केल्यास अळींचा बंदोबस्त करता येतो. तुरीवरील अळींचा बंदोबस्त करण्याकरिता प्रती हेक्टरी २० पक्षी थांबे शेतात उभारावे, तुरीच्या झाडाखाली पोते टाकून झाड हलविल्यास अळ्या खाली पडतात. कपासीमधील अंबाडीवर्गीय पर्यायी वनस्पतीचा नायनाट केल्यास रोगावर नियंत्रण आणता येतो.
घाटेअळीपासून हरभºयाला धोका
हरभरा पिकावर घाटेअळीचा प्रादुर्भाव होतो. या किडीची मादी हरभºयांच्या पानावर अंडी घालते. दोन ते तीन दिवसात अळी अंड्यातून बाहेर येते. त्यानंतर अळ्या हरभºयाचे आतील दाणे पोखरतात. एक अळी ३० ते ४० घाट्यांचे नुकसान करते. यावर पायबंद घालण्यासाठी पहिली फवारणी निंबोळी अर्क ५ टक्के किंवा अॅझॅडीरॅक्टीन ३०० पीपीएम ५० मिली प्रती १० लीटर पाणी किंवा ५०० एलई व ५० ग्रॅम राणीपाल तसेच ब्युव्हेरिया बॅसियाना व जैवीक बुरशीनाशकाची ६० ग्रॅम प्रती १० लीटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
शेंगा पोखरणाºया अळींच्या प्रादुर्भावापासून तुरीचा असा करा बचाव
तूर पिकावर शेंगा पोखरणाºया अळ्यांचा प्रादुर्भाव होतो. अशावेळी वेळीच उपययोजना करणे गरजेचे असते. तसेच पिसारी पतंग, शेंगे माशी आदी अळ्या व कीटकांचाही प्रादुर्भाव होतो. या तिन्ही अळ्यांवर एकच उपाय केला तरी रोग नायनाट होऊ शकतो. कळी अवस्थेत पहिली फवारणी निम कीटकनाशकाची (अॅझाडिरेक्टीन ३०० पीपीएम, ५० मिली/१० लिटर पाणी) करावी. तसेच क्निालफॉस २० टक्के प्रवाही २० मिली किंवा इथियॉन ५० टक्के प्रवाही २० मिली प्रती १० लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
कपासीवर लाल ढेकणे
बिटी कपासीवर लाल ढेकण्यांचा प्रादुर्भाव दिसून येतो. सुरुवातीच्या काळात उमलत्या बोंडांमधून ढेकणे रस शोषून घेतात. काही प्रमाणात बोंडे उमलत नाही. वाट झालेले बोंडे गळून पडतात. तसेच गर्द तपकिरी रंगाची होतात. त्यामुळे यावर पायबंद घालण्यासाठी फ्लूव्हॅलीनेट २५ टक्के प्रवाहीत ४ मिली प्रती १० लिटर पाणी याप्रमाणे फवारणी करावी, फवारणी करण्यापूर्वी फुटलेले बोंड वेचून घ्यावे, तसेच झाडावरून दोर फिरवून समूहाने ढेकणे केरोसीनच्या पाण्यात सोडावे.