गोरबंंजारा समाजाला संरक्षण द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 28, 2017 09:09 PM2017-12-28T21:09:41+5:302017-12-28T21:09:52+5:30

गोरबंजारा समाजाला संवैधानिक हक्क प्रदान करून तेलंगणा राज्यातील हिंसाचारग्रस्त समाजबांधवांना संरक्षण द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय गोरबंजारा संवैधानिक न्याय हक्क समितीने तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.

Protect Gorbanjara community | गोरबंंजारा समाजाला संरक्षण द्या

गोरबंंजारा समाजाला संरक्षण द्या

Next
ठळक मुद्देतहसीलदारांना निवेदन : न्यायहक्क महासमितीची शासनाकडे मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : गोरबंजारा समाजाला संवैधानिक हक्क प्रदान करून तेलंगणा राज्यातील हिंसाचारग्रस्त समाजबांधवांना संरक्षण द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय गोरबंजारा संवैधानिक न्याय हक्क समितीने तहसीलदारांमार्फत पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, संपूर्ण भारतात गोरबंजारा समाज साधारणपणे ४४ वेगवेगळ्या नावांनी ओळखला जातो. १२ कोटींच्या जवळपास लोकसंख्या असणारी ही जमात प्रांतरचना करताना, सामाजिक आरक्षण देताना तसेच संवैैधानिक मानवाधिकार प्रदान करताना वंचित राहिली. १५ डिसेंबर २०१७ ला तेलंगणा राज्यात त्यांना राज्यघटनेच्या स्थापनेपासून मिळणाºया अनुसूचित जमातीच्या सवलती मिळू नयेत म्हणून काही जमातींकडून हिंसाचार घडवून आणण्यात आला. यात अनेक गोरबंजारा समाजाचे लोक मृत्यूमुखी पडले. काही जण गंभीर जखमी झाले. अनेकांच्या मालमत्तेचे प्रचंड नुकसान झाले. त्यामुळे गोरबंजारा समाजाला संवैैधानिक हक्क प्रदान करून हिंसाचारग्रस्तांना संरक्षण द्यावे, अशी मागणी अखिल भारतीय गोरबंजारा संवैैधानिक न्यायहक्क महासमितीच्या वतीने मुख्यमंत्री, विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी गडचिरोली यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली.
आजही हा समाज केवळ घाटी, वाणी, बानो, तांडा पंचायत व स्वतंत्र वसाहतीत प्राचीन प्रणालीनुसार जीवन जगत आहे. या समाजाची स्थिती अद्यापही हलाखीची आहे. त्यामुळे या समाजाला संवैैधानिक हक्क प्रदान करून संपूर्ण राज्यात संरक्षण द्यावे तसेच तेलंगणा राज्यात समाजाविरोधात हिंसाचार घडविणाºयांवर कारवाई करावी, अशी मागणी दत्तात्रय जाधव, आशिष चव्हाण, गुलाबसिंग राठोड, अरविंद जाधव, गोपाल जाधव यांनी केली आहे.

Web Title: Protect Gorbanjara community

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.