लसीकरणातून आपल्यासोबत इतरांचेही संरक्षण करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:37 AM2021-01-25T04:37:06+5:302021-01-25T04:37:06+5:30
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांंना सध्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस टोचली जात आहे. शनिवारी डॉ. बंग कुटुंबीयांचा नंबर आल्यानंतर त्यांनी लसीकरणाला ...
जिल्ह्यातील आरोग्य कर्मचाऱ्यांंना सध्या लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यात लस टोचली जात आहे. शनिवारी डॉ. बंग कुटुंबीयांचा नंबर आल्यानंतर त्यांनी लसीकरणाला हजेरी लावली. यावेळी डॉ. बंग दाम्पत्याने सर्वसामान्यांप्रमाणे आरोग्य कर्मचाऱ्यांसोबत रांगेत राहून लस टोचून घेतली. उपस्थित इतर आरोग्य कर्मचारी, अधिकारी यांच्याशी त्यांनी संवादही साधला. जिल्ह्यातील सर्व आरोग्य कर्मचाऱ्यांनी जसजसा आपला नंबर येईल तसतशी लस टोचून घ्यावी, असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रुडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर उपस्थित होते.
डॉ. राणी बंग म्हणाल्या, जिल्ह्यातील आरोग्य सुविधा अतिशय चांगल्या असून, कोविड लसीकरणाबाबत आमचा चांगला अनुभव आहे. कुणीही लसीबाबत गैरसमज करून घेऊ नये. या ठिकाणी सर्व कर्मचारी अनुभवी आहेत. कुणीही लसीकरणाला घाबरू नये.
जिल्ह्यातील शासकीय व खासगी कोविडविषयी काम करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांनाही सध्या लस टोचली जात आहे.