परिसर दारूमुक्त करण्यासाठी महिलांचे पाेलिसांना साकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 2, 2021 05:18 AM2021-09-02T05:18:32+5:302021-09-02T05:18:32+5:30

भामरागड पोलीस स्टेशनमध्ये ‘राखी विथ खाकी’ उपक्रमांअंतर्गत रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासह ३५ पोलीसबांधवांना ...

To protect the premises from alcohol, women should join the police | परिसर दारूमुक्त करण्यासाठी महिलांचे पाेलिसांना साकडे

परिसर दारूमुक्त करण्यासाठी महिलांचे पाेलिसांना साकडे

Next

भामरागड पोलीस स्टेशनमध्ये ‘राखी विथ खाकी’ उपक्रमांअंतर्गत रक्षाबंधन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी पोलीस निरीक्षक किरण रासकर यांच्यासह ३५ पोलीसबांधवांना परिसरातील विविध गावांतील १६ महिलांनी राखी बांधून परिसरातील अवैध दारूविक्रीकडे पोलिसदादांचे लक्ष वेधत दारूबंदीची ओवाळणी मागितली. कार्यक्रमात सभापती गोईताई, दारूबंदी महिला समिती अध्यक्ष भारती ईष्टाम, शीला येंपलवार सहभागी झाल्या होत्या. अतिदुर्गम नारगुंडा पोलीस मदत केंद्रातील प्रभारी अधिकारी सानफ, पोलीस उपनिरीक्षक क्षीरसागर यांच्यासह १४ पोलीस बांधवांना १० महिलांनी राखी बांधली. ताडगाव पोलीस मदत केंद्रात प्रभारी अधिकारी सौरव पिंगळे, पोलीस उपनिरीक्षक मनोज अहिरे, सयाम यांच्यासह एकूण २४ पोलीसबांधवांना महिलांनी राखी बांधली तसेच धोडराज पोलीस मदत केंदात प्रभारी अधिकारी राजेश धाडगे, पोलीस उपनिरीक्षक श्रीकांत गुरव, हर्षल बागेल यांच्यासह ४० पोलीसबांधवांना विविध गावांतील १३ महिलांनी राखी बांधून दारूबंदीची ओवाळणी मागितली.

बाॅक्स

गडचिराेलीत ‘राखी विथ खाकी’

पाेलीस व मुक्तिपथ गाव संघटनेतर्फे गडचिराेली पाेलीस ठाण्यात ‘राखी विथ खाकी’ हा उपक्रम राबविण्यात आला. याअंतर्गत महिलांनी पोलिसांना राखी बांधून अनोखी ओवाळणी मागत अवैध दारू बंद करून सहकार्य करण्याची विनंती केली. तालुक्यातील ४२ महिलांनी १७ पोलीस बांधवांना राखी बांधली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद बानबले, सहायक पोलीस निरीक्षक शरद मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक अविनाश चव्हाण, स्वप्निल गोपाले उपस्थित होते. पोटेगाव मदत केंद्रात ६५ पोलीस बांधवांना ५ गावांतील १९ महिलांनी राखी बांधून पोटेगाव, गवळहेटी व सुईमारा या गावातील अवैध दारू विकी बंद करण्याची विनंती केली. कार्यक्रमाला प्रभारी अधिकारी विनय घोडसे, एसआरपीएफचे पोलीस निरीक्षक आर. आर. वाघ उपस्थित होते.

Web Title: To protect the premises from alcohol, women should join the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.