गावातील दारूबंदी करून रक्षा करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 29, 2021 04:34 AM2021-08-29T04:34:55+5:302021-08-29T04:34:55+5:30
पोलीस मदत केंद्र चातगाव येथे राखी विथ खाकी उपक्रमांतर्गत खुटगाव, चातगाव, मेंढातोला, गट्टेपायली या चार गावांतील २३ महिलांनी प्रभारी ...
पोलीस मदत केंद्र चातगाव येथे राखी विथ खाकी उपक्रमांतर्गत खुटगाव, चातगाव, मेंढातोला, गट्टेपायली या चार गावांतील २३ महिलांनी प्रभारी अधिकारी पाटील यांच्यासह केंद्रातील २१ पोलीस बांधवाना राखी बांधून अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करण्याचे वचन घेतले. मुरुमगाव पोलीस मदत केंद्रात आयोजित कार्यक्रमात हिरंगे, मुरुमगाव येथील गाव संघटनेच्या १२ महिलांनी सहभाग घेतला होता. यावेळी महिलांनी २५ पोलीस बांधवांना राखी बांधून अवैध दारूविक्रीवर अंकुश लावण्याची मागणी केली. गट्टा पोलीस मदत केंद्रातील पोलीस उपनिरीक्षक कांभीरे यांच्या उपस्थितीत रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पडला. यावेळी गुरगाव, गट्टा व गोटा या गावातील १४ महिलांनी २६ पोलीस बांधवांना राखी बांधून दारूविक्रेत्यांवर कारवाई करण्याची विनंती केली.
बाॅक्स
कारवाफा पोलीस मदत केंद्रातही रक्षाबंधन
कारवाफा पोलीस मदत केंद्रात आयोजित कार्यक्रमात सहायक पोलीस निरीक्षक शिंदे, पोलीस उपनिरीक्षक रॉय, पवार उपस्थित होते. दरम्यान कारवाफा, तळोधी, कुथेगाव, येथील १८ महिलांनी २८ पोलीसदादांना राखी बांधत अवैध दारूविक्रीच्या समस्येकडे लक्ष वेधले. धानोरा येथील पोलीस ठाण्यात धानोरा, माळनदा, चिचोली, सोडे व सालेभट्टी गाव संघटनेच्या वतीने राखी विथ खाकी उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी स्वप्नील जाधव, सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक आंदेलवार यांच्यासह ठाण्यातील २८ पोलीसदादांना २१ महिलांनी राखी बांधून अवैध दारूविक्रेत्यांवर कठोर कारवाई करीत दारूविक्री बंद करण्याची मागणी केली. यावेळी उपविभागीय पोलीस अधिकारी जाधव यांनी आपण महिलांच्या पाठीमागे उभे असल्याचे सांगितले. गावातील अवैध दारूविक्रेत्यांची माहिती द्या, आपण कारवाई करू, अशी ग्वाही दिली.