अहेरीतील हायमास्ट व पथदिवे बंदचा अनोख्या पद्धतीने केला निषेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:33 AM2021-08-01T04:33:47+5:302021-08-01T04:33:47+5:30

याबाबत भाजपा अहेरीतर्फे निवेदन देऊन वारंवार दुरुस्त करण्याची मागणी केल्यावरही अहेरी नगर पंचायत प्रशासनातर्फे ह्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, ...

Protest against the closure of high mast and street lights in Aheri in a unique way | अहेरीतील हायमास्ट व पथदिवे बंदचा अनोख्या पद्धतीने केला निषेध

अहेरीतील हायमास्ट व पथदिवे बंदचा अनोख्या पद्धतीने केला निषेध

Next

याबाबत भाजपा अहेरीतर्फे निवेदन देऊन वारंवार दुरुस्त करण्याची मागणी केल्यावरही अहेरी नगर पंचायत प्रशासनातर्फे ह्याकडे दुर्लक्ष करण्यात येत आहे, यामुळे सध्या नागरिकांना तसेच व्यापाऱ्यांना मोठा मनस्ताप होत आहे, या समस्येची दखल घेत भाजपा अहेरीतर्फे शुक्रवारी संध्याकाळी कै. राजे विश्वेश्वरराव महाराज चौकातील हायमास्ट समोर मेणबत्ती पेटवून या मुख्य हायमास्ट लाईटला श्रद्धांजली वाहण्यात आली. भाजपा कार्यकर्त्यांनी अहेरी नगर पंचायत प्रशासनाविरुद्ध प्रचंड नारेबाजी करून झोपलेल्या प्रशासनाला जागविण्याचा प्रयत्न करीत, अभिनव पद्धतीने अहेरी नगर पंचायत प्रशासनाचा निषेध केला.

यावेळी भाजपा अहेरीचे रवी नेलकुद्री, अमोल गुडेल्लीवार, शंकर मगडीवार, संतोष मद्दीवार, मुकेश नामेवार, विक्की तोडसाम, पंचायत समिती सदस्य प्रशांत ढोंगे, श्रीनिवास चटारे, नारायण सिडाम, प्रशांत नामनवार, उमेश गुप्ता, चंद्रिका प्रसाद गुप्ता, संतोष दोंतुलवार, राकेश गुप्ता, सागर गुप्ता, दिलीप गुब्बावार याच्यासह अहेरी शहरातील भाजपा पदाधिकारी व व्यापारी उपस्थित होते.

310721\img_20210731_111004.jpg

अहेरी शहरातील बंद हायमास्ट लाईट व पथदिवे समोर निषेध करताना भाजपा कार्यकर्ते व इतर

Web Title: Protest against the closure of high mast and street lights in Aheri in a unique way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.