‘त्या’ कामगारांना परत कामावर न घेतल्यास आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2020 04:34 AM2020-12-29T04:34:45+5:302020-12-29T04:34:45+5:30

२०१८ राेजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय सुरू झाले. नवीन रुग्णालयात डाॅक्टरसह आराेग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली.परंतु सफाई व ...

Protest if ‘those’ workers are not rehired | ‘त्या’ कामगारांना परत कामावर न घेतल्यास आंदाेलन

‘त्या’ कामगारांना परत कामावर न घेतल्यास आंदाेलन

Next

२०१८ राेजी जिल्हा महिला व बाल रुग्णालय सुरू झाले. नवीन रुग्णालयात डाॅक्टरसह आराेग्य कर्मचाऱ्यांची पदे भरण्यात आली.परंतु सफाई व अन्य कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली नाही. रुग्णालयातील या कामाकरिता २९ कामगारांची नियुक्ती करण्यात आली. त्यांना १६० रुपये प्रतीदिवस याप्रमाणे माेबदला दिला जात हाेता. सुरूवातीपासूनच हे कामगार उत्कृष्ट सेवा देत हाेते. काेराेना काळातही या कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणे कर्तव्य पार पाडले. या दरम्यान रुग्णालयाला स्वच्छता संबंधी पुरस्कारसुद्धा मिळाला. असे असतानाही कामगारांना काेणतीही पूर्वसूचना न देता कामावरुन काढून टाकले. त्यामुळे कर्मचाऱ्यांवर बेराेजगारीची कुऱ्हाड काेसळली आहे. या कामगारांच्या जागी दुसऱ्या कामगारांची नियुक्ती कंपनीमार्फत केली जाणार असल्याची माहिती आहे. जुन्या २९ कामगारांना कामावरुन न काढता त्यांना पूर्ववत कामावर घ्यावे, अन्यथा आंदाेलन करण्यात येईल, असा इशारा स्त्रीशक्ती संघटनेच्या वतीने देण्यात आला. विशेष म्हणजे, कामगारांनी छाया कुंभारे यांना निवेदन सादर करुन कामगारांना न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे.

Web Title: Protest if ‘those’ workers are not rehired

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.