शेतकऱ्यांच्या हक्कासाठी रांगी येथे आंदाेलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 4, 2021 04:30 AM2021-01-04T04:30:09+5:302021-01-04T04:30:09+5:30
रांगी : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आधारभूत किंमत खरेदी याेजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदीची प्रक्रिया हाती घेण्यात आली ...
रांगी : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आधारभूत किंमत खरेदी याेजनेंतर्गत यंदाच्या खरीप हंगामात धान खरेदीची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे. मात्र, जिल्ह्यातील वनहक्कधारक व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांना सातबाऱ्याअभावी धान विक्रीत अडचण येत आहे. शासनाने वनहक्क व अतिक्रमणधारक शेतकऱ्यांसह इतर सर्व शेतकऱ्यांना न्याय द्यावा, या मागणीसाठी आमदार डाॅ. देवराव हाेळी यांच्या नेतृत्वात रांगी येथील आधारभूत धान खरेदी केंद्रावर आंदाेलन करण्यात आले. यावेळी भाजपचे धानाेरा तालुका अध्यक्ष शशिकांत साळवे, दिलीप काटेंगे, नारायण हेमके, विलास भोयर, जगदीश कन्नाके, नरेंद्रजी भुरसे, सुरेश हलामी, ठुमराज कुकडकर, देवराव कुनघाडकर, श्रावण देशपांडे, बाबूराव गडपायले, तरुण मोगरे, प्रदीप गेडाम, ज्ञानेश्वर भैसारे, लोमाजी लाकूडवाहे, हेमंत कपास, रागोबाजी पासंडे, रवींद्र रोहणकर, मनोहर बैस, नंदू हेमके, मनोहर भुरसे, रामदास बायाड, गजानन अथरगडे, प्रकाश कुनघाडकर, प्रभाकर कन्नाके, कालिदास टोपा, नेताजी पुराम, नंदू उसेंडी, भास्कर चापडे, नरेंद्र बोरसरे यांच्यासह रांगी परिसरातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यावेळी आमदार डॉ. देवराव होळी यांनी, धानाला २० क्विंटल खरेदीच्या मर्यादेसह अतिक्रमित व वनहक्कधारक शेतकऱ्यांचे धान महामंडळाच्या माध्यमातून खरेदी करण्यात यावा व त्यांना महामंडळाच्या सर्व योजनांचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी केली.
===Photopath===
030121\03gad_1_03012021_30.jpg
===Caption===
रांगी येथील केंद्रावर घाेषणाबाजी करताना आमदार डाॅ.देवराव हाेळी व शेतकरी, कार्यकर्ते.