रोजगार द्या, अन्यथा भत्ता द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 25, 2018 12:15 AM2018-11-25T00:15:17+5:302018-11-25T00:18:21+5:30
रिकाम्या हाताला काम द्या, अन्यथा युवकांना शासनाने प्रतिमाह तीन हजार रूपये बेरोजगारी भत्ता द्यावा, अशी मागणी करीत आम आदमी पार्टीच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्रात रोजगार मागणीचे अर्ज वितरित करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : रिकाम्या हाताला काम द्या, अन्यथा युवकांना शासनाने प्रतिमाह तीन हजार रूपये बेरोजगारी भत्ता द्यावा, अशी मागणी करीत आम आदमी पार्टीच्या वतीने आरमोरी विधानसभा क्षेत्रात रोजगार मागणीचे अर्ज वितरित करण्यात आले.
आम आदमी पार्टी आरमोरी विधानसभा क्षेत्राच्या वतीने गुरूवारी सुशिक्षित बेरोजगारांना रोजगार मागणी अर्जाच्या वाटपाचा शुभारंभ आरमोरी विधानसभा क्षेत्र अध्यक्ष विजय समर्थ यांच्या हस्ते करण्यात आला. या अर्जाद्वारे प्रत्येक बेरोजगार युवक शासनाकडे प्रतिमहा तीन हजार रूपये बेरोजगार भत्ता देण्याची मागणी करणार आहे. पार्टीच्या या मोहिमेला बेरोजगारांचा उत्तम प्रतिसाद मिळत आहे. विधानसभा क्षेत्रात पाच हजार अर्ज बेरोजगारांना नि:शुल्क वितरित करण्यात येणार आहे. रिकाम्या हाताला काम देण्याची जबाबदारी शासनाची आहे. परंतु शासन ही जबाबदारी पार पाडू शकत नसेल तर बेरोजगारांना प्रतीमाह तीन हजार रूपये भत्ता द्यावा, अशी मागणी केली जाणार असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अर्ज वाटप कार्यक्रमाच्या शुभारंभप्रसंगी संजय चट्टे, शैलेश कोहळे, मनोज जुआरे, आरमोरी तालुका संयोजक मधुसुदन चौधरी, खुशाल रासेकर, सचिन भोयर, किशोर गोंदोळे, प्रियंका गोंदोळे, महादेव कोपुलवार व पदाधिकारी हजर होते.