पेरमिली भागात फाेर-जी इंटरनेट सेवा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 25, 2021 04:40 AM2021-05-25T04:40:44+5:302021-05-25T04:40:44+5:30
पेरमिली येथे बीएसएनएलचे मोबाइल टॉवर आहे. परिसरात २० ते २५ गावांचा समावेश आहे. त्यामानाने बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात ...
पेरमिली येथे बीएसएनएलचे मोबाइल टॉवर आहे. परिसरात २० ते २५ गावांचा समावेश आहे. त्यामानाने बीएसएनएलच्या ग्राहकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. सध्या ग्राहकांकडे अॅण्ड्राॅइड मोबाइल असल्याने अनेक जण मोबाइलवर अनेक ऑनलाइन कामे करतात. अनेक खासगी कंपन्यांची फोर-जी सेवा या भागात मिळत असली तरी बीएसएनएलची थ्री-जी सेवा नावापुरतीच आहे. टू-जीचा स्पीडसुद्धा ग्राहकांना मिळत नसल्याने ते असमाधानी आहेत. ऑनलाइन शॉपिंग, बँकिंग तसेच अन्य कामांसाठी मोबाइल इंटरनेटचा स्पीड आवश्यक प्रमाणात असणे गरजेचे आहे. मात्र, मागील १५ दिवसांपासून या भागातील इंटरनेट सेवा वारंवार विस्कळीत होत आहे. तसेच मंदगतीने सुरू असल्याने ऑनलाइन कामांमध्ये अडचणी येत आहेत. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारीसुद्धा अनभिज्ञ असल्याचा आव आणून दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालून पेरमिली येथील थ्री-जी इंटरनेट सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ग्राहकांनी केली आहे.