प्रत्येक तालुक्याला अग्निशमन यंत्रणा द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2021 04:24 AM2021-07-21T04:24:35+5:302021-07-21T04:24:35+5:30
कर्जेलीला रस्ता नाही जिमलगट्टा : छत्तीसगड राज्याच्या सीमलेगत असलेल्या कर्जेली गावात जाण्यासाठी रस्ता नाही. गावाच्या दोन्ही बाजूला नाले असून, ...
कर्जेलीला रस्ता नाही
जिमलगट्टा : छत्तीसगड राज्याच्या सीमलेगत असलेल्या कर्जेली गावात जाण्यासाठी रस्ता नाही. गावाच्या दोन्ही बाजूला नाले असून, या नाल्यांवर पूल नसल्याने पावसाळ्यात या गावाचा जगाशी संपर्क तुटतो. कर्जेली गावात जवळपास ७० कुटुंब आहेत.
पेट्रोलची अवैध विक्री
आष्टी : चामोर्शी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्याच्या ग्रामीण व दुर्गम भागात जादा दराने पेट्रोलची विक्री सुरू आहे. खेड्यातील काही किराणा दुकानदार विक्रीसाठी पेट्रोलपंपावरून पेट्राेल नेतात. गावात अधिक दराने पेट्राेलची विक्री केली जात आहे.
कुरखेडा येथे पार्किंग द्या
कुरखेडा : शहरातील मुख्य चौकात पार्किंगची व्यवस्था नाही. त्यामुळे नागरिक रस्त्यावरच वाहने उभी करतात. त्यामुळे वाहतुकीची समस्या निर्माण होत असून, अपघाताची शक्यता वाढली आहे. पार्किंगची साेय नसल्याने ग्राहक रस्त्यावरच वाहने उभी करतात.
अनियमित वीज पुरवठा
घोट : चामोर्शी तालुक्यातील महत्त्वाचे गाव असलेल्या घोट परिसरातील मक्केपल्ली भागात विद्युत विभागाच्या दुर्लक्षामुळे अनियमित वीज पुरवठा केला जात आहे. याठिकाणी बसविण्यात आलेल्या ट्रान्सफार्मरच्या देखभाल, दुरूस्तीकडे दुर्लक्ष होत आहे.
शिधापत्रिका मिळेना
कुरखेडा : जिल्ह्यातील दुर्गम भागातील नागरिकांना शिधापत्रिका मिळाली नसल्याने अजूनही ते वंचित आहेत. तहसील कार्यालयात परीपूर्ण कागदपत्रासह अर्ज केल्यानंतरही तालुक्यातील एपीएल नागरिकांना शिधापत्रिका देण्यात आल्या नाही. अर्ज केल्यानंतरही अनेक महिने नागरिकांना प्रतीक्षाच करावी लागते.
अतिक्रमणामुळे अडथळा
गडचिरोली : रस्त्याच्या दोन्ही बाजुला अतिक्रमण करण्यात आले आहे. सदर टपऱ्या लहान आहेत. मात्र दिवसा त्यापुढेही विस्तार करून वस्तू ठेवल्या जातात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत आहे. नागरिकांच्या मागणीकडे प्रशासनाचे दुर्लक्ष हाेत आहे.