रेशन कार्ड केवायसी करून अन्नधान्य द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 8, 2020 05:00 AM2020-08-08T05:00:00+5:302020-08-08T05:00:54+5:30
यासंदर्भात नागरिकांनी कुरखेडाच्या तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन देताना पुराडाचे सरपंच रेखा ब्रह्मनायक, माजी उपसरपंच अशोक उसेंडी तसेच नागरिक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तहसील कार्यालयामार्फत राशनकार्डचे वाटप करण्यात आले. मात्र ४० कुटुंबांना अन्नधान्य मिळत नाही. राशन दुकानात व तहसील कार्यालयात वारंवार चकरा मारून सुद्धा आजपर्यंत राशनकार्ड केवायसी करण्यात आले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
पुराडा : कुरखेडा तालुक्याच्या पुराडा, कुंभीटोला, हेटीगर व कन्हाळटोला या गावातील एकूण लोकसंख्या २ हजार ९२५ असून ६९० कुटुंब आहेत. त्यापैकी ४० कुटुंब सरकारी स्वस्त धान्य दुकानातून मिळणाऱ्या अन्नधान्यापासून वंचित आहेत. या कुटुंबाचे राशनकार्ड केवायसी करून अन्नधान्याचा लाभ देण्यात यावा, अशी मागणी वंचित कुटुंबांनी केली आहे.
यासंदर्भात नागरिकांनी कुरखेडाच्या तहसीलदारांना निवेदन दिले. निवेदन देताना पुराडाचे सरपंच रेखा ब्रह्मनायक, माजी उपसरपंच अशोक उसेंडी तसेच नागरिक उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की, कुरखेडा तहसील कार्यालयामार्फत राशनकार्डचे वाटप करण्यात आले. मात्र ४० कुटुंबांना अन्नधान्य मिळत नाही. राशन दुकानात व तहसील कार्यालयात वारंवार चकरा मारून सुद्धा आजपर्यंत राशनकार्ड केवायसी करण्यात आले नाही. केवायसीअभावी कार्डधारकांना अन्नधान्यापासून वंचित राहावे लागत असून मानसिक मनस्ताप होत आहे.
कोविड लॉकडाऊनच्या काळात या ४० कुटुंबांचा रोजगार हिरावला आहे. आर्थिक परिस्थिती हलाखीची झाली आहे. अशा परिस्थितीत सवलतीच्या दरात मिळणाºया अन्नधान्याची गरज आहे. तहसील कार्यालयाने राशनकार्डची केवायसी कारवाई तातडीने करून या महिन्यापासून अन्नधान्याचा लाभ द्यावा, अशी मागणी करून तहसीलदारांशी चर्चा करण्यात आली.