पंचायत समिती व नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनासाठी निधी उपलब्ध करून द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 9, 2021 04:39 AM2021-03-09T04:39:27+5:302021-03-09T04:39:27+5:30
गडचिराेली - गडचिरोली, चामोर्शी, धानोरा पंचायत समितीच्या व गडचिरोली नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनासाठी निधी उपलब्ध करून द्या, अशी ...
गडचिराेली - गडचिरोली, चामोर्शी, धानोरा पंचायत समितीच्या व गडचिरोली नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनासाठी निधी उपलब्ध करून द्या, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांची जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली. विधानभवन मुंबई येथे भेट घेऊन जिल्हा वार्षिक योजनेतून निधी उपलब्ध करून देण्याची विनंती केली.
चामोर्शी पंचायत समितीच्या प्रशासकीय भवनासाठी ७ कोटी ३६.५० लक्ष व गडचिरोली पंचायत समितीच्या भवनासाठी ६ कोटी ६६ लक्ष , धानोराकरिता ५ कोटी तर गडचिरोली नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनासाठी ५ कोटी रुपयांची मागणी केली. चामोर्शी पंचायत समितीच्या प्रशासकीय भवनासाठी ७ कोटी ३६.५० लक्ष व गडचिरोली पंचायत समितीच्या भवनासाठी ६ कोटी ६६ लक्ष रूपयांचा, धानोराकरिता ५ कोटी रुपयांचा प्रस्ताव जिल्हा वार्षिक योजनेतून मंजूर करून निधी उपलब्ध करुन द्यावा तर नगरविकास मंत्रालयामार्फत गडचिरोली नगरपरिषदेच्या प्रशासकीय इमारतीकरिता ५ कोटी रुपये मंजूर करावे, अशी मागणी आमदार डॉ. देवराव होळी यांनी मुंबई येथे गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन केली
चामोर्शी व गडचिरोली येथील पंचायत समितीच्या इमारती निर्लेखित झालेल्या असून धानोरा येथील इमारतही फार जुनी आहे. त्या ठिकाणी नवीन प्रशासकीय इमारतीचे बांधकाम होणे आवश्यक आहे. याबाबत आमदार डॉ.देवराव होळी वारंवार आढावा बैठकीतून पाठपुरावा करीत असून तसा प्रस्ताव पाठविण्याची सूचना केली होती. आता याबाबतचे प्रस्ताव शासन स्तरावर असून या प्रस्तावाला गडचिरोली जिल्ह्याच्या वार्षिक योजनेतून मंजूर करून तातडीने निधी उपलब्ध करून द्यावा तर गडचिरोली नगरपरिषदेच्या प्रशासकीय भवनासाठी नगरविकास मंत्रालयाने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागणी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ. देवराव होळी यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली.