खरीप हंगामापूर्वी प्रोत्साहनपर अनुदान द्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:37 AM2021-05-19T04:37:55+5:302021-05-19T04:37:55+5:30
कोरोना संकटात शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. ३१ मार्चनंतर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धान जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी ...
कोरोना संकटात शेतकरी आधीच हवालदिल झाला आहे. ३१ मार्चनंतर ज्या शेतकऱ्यांनी खरीप हंगामातील धान जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाच्या केंद्राला विकले, अशा शेतकऱ्याचे धानाचे चुकारे अद्यापही झाले नाही. अशा शेतकऱ्यांची रक्कम देखील खरीप हंगामाच्या पूर्वी मिळाल्यास खत, बियाणे, कीटकनाशके खरेदी करण्यासाठी ही रक्कम शेतकऱ्यांना खरीप हंगामासाठी वापरता येईल. या परिस्थितीचा विचार करून राज्य सरकारने नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना अनुदानाचा प्रश्न निकाली काढावा, अशी मागणी केली आहे.
तसेच मागील खरीप हंगामातील धानाची उचल न झाल्याने यंदा रबी हंगामातील धान खरेदीसुद्धा अडचणीत आली आहे. त्यामुळे आदिवासी आदिवासी विकास महामंडळाने धानाची उचल करून रब्बी हंगामातील खरेदीला सुरुवात करावी, अशीही मागणी टेकाम यांनी निवेदनातून शासनाकडे केली आहे.