अहेरीत एमपीएससी परीक्षा केंद्र द्या

By Admin | Published: July 4, 2016 01:08 AM2016-07-04T01:08:52+5:302016-07-04T01:08:52+5:30

एमपीएससीच्या सर्वच परीक्षा जिल्हास्तरावर म्हणजे गडचिरोली येथे घेण्यात येतात. मात्र गडचिरोली जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता ....

Provide a non-standard MPSC examination center | अहेरीत एमपीएससी परीक्षा केंद्र द्या

अहेरीत एमपीएससी परीक्षा केंद्र द्या

googlenewsNext

एसडीओंना निवेदन : अहेरी, एटापल्ली, भामरागड तालुक्यातील युवकांसाठी सोयीचे
आलापल्ली : एमपीएससीच्या सर्वच परीक्षा जिल्हास्तरावर म्हणजे गडचिरोली येथे घेण्यात येतात. मात्र गडचिरोली जिल्ह्याचा विस्तार लक्षात घेता सिरोंचा, एटापल्ली, भामरागड, अहेरी येथील विद्यार्थ्यांना गडचिरोली येथे जाणे अडचणीचे होत असल्याने अहेरी येथे एमपीएससीच्या परीक्षांचे केंद्र देण्यात यावे, अशी मागणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या मार्फतीने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे.
गडचिरोली हा ४०० किमी अंतराचा जिल्हा आहे. अहेरीपासून गडचिरोलीचे अंतर ११५ किमी आहे. तर सिरोंचापासून २२० किमी आहे. शेवटच्या टोकावरील गावांचे अंतर ३९० ते ४०० किमीच्या जवळपास आहे. एवढे अंतर पार करून गडचिरोली येथे येऊन परीक्षा देणे सर्वसामान्य विद्यार्थ्याला शक्य होत नाही. त्याचबरोबर त्याच दिवशी तो परतही जाऊ शकत नाही. त्याला आदल्या दिवशी व नंतरच्या दिवशी गडचिरोली येथेच मुक्काम करावा लागतो. अहेरी येथे परीक्षा केंद्र दिल्यास सोयीस्कर होईल, अशी मागणी निवेदनातून केली आहे. निवेदन देतेवेळी जागृत युवामंचचे अध्यक्ष राहूल पेंडारकर, सचिन खोब्रागडे, रवी दुर्गम, विनोद लेकामी, राजेश तोरगरवार यांनी केली आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Provide a non-standard MPSC examination center

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.