शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण नि:शुल्क द्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 24, 2021 04:21 AM2021-07-24T04:21:42+5:302021-07-24T04:21:42+5:30

प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करावी. जेणेकरून त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्याचा लाभ होईल ...

Provide in-service training to teachers free of cost | शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण नि:शुल्क द्या

शिक्षकांना सेवांतर्गत प्रशिक्षण नि:शुल्क द्या

Next

प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्र मिळण्याची प्रक्रिया ३१ ऑक्टोबर २०२१ पर्यंत पूर्ण करावी. जेणेकरून त्यानंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील त्याचा लाभ होईल व पुन्हा ऑक्टोबरनंतर सेवानिवृत्त होणाऱ्या कर्मचाऱ्यांना सूट देण्याचा शासन निर्णय निर्गमित करण्याची वेळ शासनावर येणार नाही, असे निवेदनात म्हटले आहे. राज्यातील शिक्षकांना वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी आवश्यक सेवांतर्गत प्रशिक्षण शासनाने सन २०१५ पासून आयोजित केले नसल्याने हजारो शिक्षक वरिष्ठ व निवड वेतनश्रेणी मिळण्यापासून वंचित आहे.

आता शासनाने वरिष्ठ व निवड वेतन श्रेणीसाठी दहा दिवसाचे ऑनलाईन प्रशिक्षण घेण्यास मंजुरी दिली असून प्रशिक्षण आयोजित करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे यांचेकडे सोपवली आहे.

Web Title: Provide in-service training to teachers free of cost

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.