आश्रमशाळांना सुविधा पुरवा

By admin | Published: August 10, 2015 01:00 AM2015-08-10T01:00:56+5:302015-08-10T01:00:56+5:30

जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची दुरवस्था झाली आहे.

Provide shelter to the ashram schools | आश्रमशाळांना सुविधा पुरवा

आश्रमशाळांना सुविधा पुरवा

Next

शिक्षणमंत्र्यांना निवेदन : अहेरी जिल्हा कृती समितीची मागणी
अहेरी : जिल्ह्यातील जवळपास सर्वच शासकीय व अनुदानित आश्रमशाळांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. शासनाने या गंभीर बाबीकडे लक्ष घालून आश्रमशाळांमधील विद्यार्थ्यांना सोयीसुविधा पुरवाव्या. अन्यथा तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा अहेरी जिल्हा निर्माण कृती समितीचे अध्यक्ष रघुनाथ तलांडे यांच्या नेतृत्वात पालकमंत्री व शिक्षणमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून दिला आहे.
सदर निवेदन अहेरीचे अतिरिक्त जिल्हाधिकारी कार्यालयातील नायब तहसीलदार राजेंद्र अमेरकर यांच्या मार्फतीने मुख्यमंत्री व पालकमंत्र्यांकडे पाठविण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की, पेरमिली आश्रमशाळेत गणित, इंग्रजी, मराठी विषयाच्या तीन शिक्षकांची आवश्यकता आहे. माध्यमिक मुख्यध्यापकांचे पद रिक्त आहे. प्राथमिक स्तरावर चार शिक्षकांची आवश्यकता आहे. इतरही आश्रमशाळांमध्ये शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांची पदे रिक्त आहेत. सदर पदे भरून सोयीसुविधा पुरवाव्या असे निवेदनात म्हटले आहे. यावेळी रघुनाथ तलांडे यांच्यासह प्रा. डॉ. पी. एल. ढेंगळे, प्रा. नागसेन मेश्राम, विलास रापर्तीवार, अतुल उईके, इमाम शेख, अविनाश अल्लुरवार, अजय गोवंशी, नागेश वेलादी, महेश सिडाम, संतोष कुमरी, अजय पायाम, मिलिंद मडावी, अजय रामेरकर, निखिल मडावी, प्रणय बागसरे, सागर गाऊत्रे, श्रीनिवास सिडाम, अंकेश बोगामी उपस्थित होते.

Web Title: Provide shelter to the ashram schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.