१० लाभार्थ्यांना अर्थसहाय्य प्रदान
By admin | Published: June 1, 2016 02:04 AM2016-06-01T02:04:51+5:302016-06-01T02:04:51+5:30
केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्त्या पुरूष व स्त्रीचा मृत्यू झाल्यास २० हजार रूपये अर्थसहाय्य देण्याची योजना आहे.
प्रत्येकी २० हजार : राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजनेअंतर्गत लाभ
आरमोरी : केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सामाजिक अर्थसहाय्य कार्यक्रमांतर्गत दारिद्र्य रेषेखालील कुटुंबातील कर्त्या पुरूष व स्त्रीचा मृत्यू झाल्यास २० हजार रूपये अर्थसहाय्य देण्याची योजना आहे. या योजनेंतर्गत आरमोरी तहसील कार्यालयातर्फे तालुक्यातील एकूण १० लाभार्थ्यांना प्रत्येकी २० हजार रूपये प्रमाणे दोन लाख रूपयांचे अर्थसहाय्य प्रदान करण्यात आले.
यासंदर्भात आरमोरीचे तहसीलदार मनोहर वलथरे यांच्या उपस्थितीत सोमवारी तहसील कार्यालयात लाभार्थ्यांना धनादेशाचे वाटप करण्यात आले. यावेळी नायब तहसीलदार डी. एस. नैताम, अव्वल कारकून हेमलता मसराम उपस्थित होत्या. याप्रसंगी सुमित्रा जगन सयाम रा. कासवी, पौर्णिमा लोमेश बोबाटे रा. सिर्सी, मधुकर बालाजी सराटे रा. नरोटी माल, सरिता नामदेव नेवारे रा. इंजेवारी, इंदिरा लालाजी भोयर रा. कुलकुली, सिंधू खुशाल पुंगाटे रा. देवखडकी, मधुकर मोतीराम मडावी रा. कुलकुली, जिजाबाई कांता हुलके रा. देलोडा (बु.), उर्मिला माणिकराव शिलार रा. रवी व विलास माणिक अलोणे रा. अरसोडा या १० लाभार्थ्यांना तहसीलदार मनोहर वलथरे यांच्या हस्ते प्रत्येकी २० हजार रूपयांचा धनादेश प्रदान करण्यात आला. सदर १० लाभार्थ्यांचे प्रस्ताव मे २०१६ मध्ये मंजूर करण्यात आले. आरमोरी तहसील कार्यालयाच्या वतीने राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य व इतर निराधार योजनांची अंमलबजावणी सुरू आहे. (शहर प्रतिनिधी)