‘त्या’ मनाेरुग्णाची सहा महिन्यांनंतर झाली स्वकियांशी भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 22, 2021 04:34 AM2021-05-22T04:34:22+5:302021-05-22T04:34:22+5:30

बाबू भवर (रा. काकंडी, ता. जि. नांदेड) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. भवर हे व्यंकटापूर येथे मागील अनेक दिवसांपासून ...

The psychiatrist met Swakiyan six months later | ‘त्या’ मनाेरुग्णाची सहा महिन्यांनंतर झाली स्वकियांशी भेट

‘त्या’ मनाेरुग्णाची सहा महिन्यांनंतर झाली स्वकियांशी भेट

Next

बाबू भवर (रा. काकंडी, ता. जि. नांदेड) असे त्या मनाेरुग्णाचे नाव आहे. भवर हे व्यंकटापूर येथे मागील अनेक दिवसांपासून फिरत हाेते. उपपाेलीस स्टेशन ते गाव परिसरात त्यांचा वावर हाेता. ते मनाेरुग्ण असल्याचे गावातील लाेकांना माहीत हाेते. परंतु त्यांच्या हालचाली संशयास्पद हाेत्या. आधीच नक्षलग्रस्त भाग असल्याने धाेका हाेऊ नये म्हणून पाेलिसांनी त्यांच्या हालचालींवरून चाैकशीसाठी ताब्यात घेतले व त्यांची विचारपूस केली. तेव्हा बाबू भवर हे मनाेरुग्ण असल्याचे दिसून आले. त्यांचे नाव, गाव व पत्त्याविषयी विचारपूस करून खात्री केली. त्यानंतर नांदेड ग्रामीण पाेलीस स्टेशनच्या पाेलीस निरीक्षकांशी फाेनद्वारे संपर्क साधला. त्यांच्या माध्यमातून काकंडी गावचे पाेलीसपाटील महादेव व्यंकाेबा बागल यांच्याशी बाेलणी करून ओळख पटविली व नातेवाईकांचा संपर्क क्रमांक मिळविला. मनाेरुग्ण इसमाचा भाचा नामदेव कदम (रा. तुपा, ता. जि. नांदेड) यांचा संपर्क क्रमांक मिळवून त्यांच्याशी बाेलणी करण्यात आली. नामदेव कदम हे १८ मे राेजी व्यंकटापूर उपपाेलीस स्टेशनमध्ये दाखल झाले. तेव्हा दाेघांनीही एकमेकांना ओळखले. या भेटीने मामा व भाच्याला अत्यानंद झाला. व्यंकटापूर पाेलिसांच्या मानवतावादी चेहऱ्यामुळेच सहा महिन्यांनंतर आपल्या कुटुंबातील व्यक्ती परत सुखरूप मिळाली, असे उद्गार नामदेव कदम यांनी काढत जिल्हा पाेलीस दलाचे आभार मानले.

बाॅक्स

१२ वर्षांपासून हाेते भरकटले

मनाेरुग्ण व्यक्ती आज इथे तर उद्या तिथे, अशी गावाेगाव भटकत असते. अधिक दूर अंतर भरकटल्यास त्याचा गावाशी संपर्क येत नाही व ती व्यक्ती कायमची भरकटते. बाबू भवर हे मागील १२ वर्षांपासून मनाेरुग्ण असून, ६ महिन्यांपूर्वी ते घरातून निघून गेले हाेते, अशी माहिती भवर यांचे भाचे नामदेव कदम यांनी दिली. भ्रमणध्वनीवरच्या चाैकशीनुसार कदम यांनी व्यंकटापूर पाेलिसांकडे बाबू भवर यांचे छायाचित्र ऑनलाईन पाठविले. भवर यांची खात्री पटल्यानंतर त्यांना व्यंकटापूर येथून घेऊन जाण्यास सांगितले.

===Photopath===

210521\21gad_8_21052021_30.jpg

===Caption===

बाबू भवर यांना भाचे कदम यांच्याकडे सुपूर्द करताना पाेलीस अधिकारी.

Web Title: The psychiatrist met Swakiyan six months later

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.