देसाईगंज तालुक्यात पं. स. साठी ३४ उमेदवार रिंगणात

By admin | Published: February 13, 2017 02:00 AM2017-02-13T02:00:32+5:302017-02-13T02:00:32+5:30

देसाईगंज तालुक्यातील सहा जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात उभे आहेत.

Pt in Desaiiganj taluka C. 34 candidates for the election | देसाईगंज तालुक्यात पं. स. साठी ३४ उमेदवार रिंगणात

देसाईगंज तालुक्यात पं. स. साठी ३४ उमेदवार रिंगणात

Next

देसाईगंज : देसाईगंज तालुक्यातील सहा जागांसाठी ३४ उमेदवार रिंगणात उभे आहेत. यातील बहुतांश उमेदवार नवखे असल्याने राजकारणाचे डावपेच आखताना वरिष्ठांची मदत घेत असल्याचे दिसून येत आहे.
कुरूड गणातून अपक्ष माया खोब्रागडे, भाजपच्या अर्चना ढोरे, काँग्रेसच्या जयश्री दुपारे, शिवसेनेच्या वैशाली अजय राऊत निवडणूक लढवित आहेत. कोकडी पंचायत समिती गणासाठी शिवसेनेच्या छाया उमेश आत्राम, भाजपातर्फे गोपाल नक्टू उईके, भारतीय राष्ट्रीय काँग्रेसतर्फे उमाकांत शिवराम कुळमेथे रिंगणात आहेत. सावंगी गणातून भाजपच्या रेवता अनोले, काँग्रेसकडून छाया खरकाटे, राकाँतर्फे रजनी पारधी, भाकपतर्फे मंगला धनविजय, शिवसेनेतर्फे सविता लेनगुरे रिंगणात आहेत. विसोरा पं. स. गणातून भाजपच्या शेवंता अवसरे, राकाँच्या सत्यवती कुथे, अपक्ष शांता तितीरमारे, काँगे्रसच्या मंदा दुधकुवर, अपक्ष सुलोचना भजने, भाकपाच्या मंगला राजगिरे, शिवसेनेच्या बबीता सहारे रिंगणात आहेत. कोरेगाव गणात शिवसेनेचे नामदेव गायकवाड, भाजपचे मोहन गायकवाड, अपक्ष लेमराव गायकवाड, रवींद्र निमकर, रमेश पर्वतकार, काँग्रेसचे राजेंद्र बुल्ले, राकाँचे भगवान राऊत निवडणूक लढवित आहेत. डोंगरगाव गणातून राकाँचे संतोष धारगावे, बसपाचे देविदास धोंडगे, भाजपचे अशोक नंदेश्वर, अपक्ष गुलाब नंदेश्वर, शिवसेनेचे श्यामराव पिल्लावन, काँग्रेसचे विलास बन्सोड, अपक्ष संदीप रहाटे, शीतलकुमार सोनपिपरे निवडणूक लढवित आहेत.
जिल्हा परिषदेची निवडणूक लढविण्यापूर्वी अनेक उमेदवारांनी पंचायत समितीमधून स्वत:चे भाग्य अजमावून पाहत आहेत. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Pt in Desaiiganj taluka C. 34 candidates for the election

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.