फिटनेससाठी पं.स.चा पुढाकार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 23, 2019 11:38 PM2019-06-23T23:38:23+5:302019-06-23T23:40:53+5:30
कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर कर्मचारी सुदृढ असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सिरोंचा : कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढवायची असेल तर कर्मचारी सुदृढ असणे आवश्यक आहे. ही बाब लक्षात घेऊन सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ.अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनात पंचायत समितीत आरोग्य तपासणी शिबिर घेण्यात आले. या शिबिरात सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली.
कामाच्या तणावामुळे कर्मचाऱ्यांमध्ये हृदयरोग, शुगर, उच्चरक्तदाब व इतर असंसर्गजन्य रोगांचे प्रमाण वाढत चालले आहे. याचा परिणाम कर्मचाऱ्यांच्या कामावर पडत आहे. प्रशासकीय काम गतीने व उत्तमरितीने होण्यासाठी कर्मचारी सुदृढ असावा, त्यासाठी कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करावे, असे निर्देश विभागीय आयुक्तांनी नागपूर येथील बैठकीत दिले. या निर्देशांचे पालन करीत पंचायत समिती सिरोंचा मधील सर्वच कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. भविष्यात सर्वच ग्रामसेवक व पंचायत समितीच्या इतर कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी केली जाईल, अशी प्रतिक्रिया सिरोंचा पंचायत समितीचे संवर्ग विकास अधिकारी डॉ. गायकवाड यांनी लोकमतशी बोलताना दिलीे.