भाजपतर्फे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबद्दल जनजागृती

By admin | Published: June 13, 2017 12:46 AM2017-06-13T00:46:43+5:302017-06-13T00:46:43+5:30

पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात विस्तारक योजनेंतर्गत कार्यक्रम आयोजित करून ...

Public awareness about the schemes of the Center and the state government | भाजपतर्फे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबद्दल जनजागृती

भाजपतर्फे केंद्र व राज्य शासनाच्या योजनांबद्दल जनजागृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दी वर्षानिमित्त जिल्ह्यात विस्तारक योजनेंतर्गत कार्यक्रम आयोजित करून केंद्र व राज्य शासनाच्या योजनांची माहिती भारतीय जनता पार्टीच्या वतीने जिल्ह्यात ठिकठिकाणी देण्यात आली.
गडचिरोली येथील सर्कीट हाऊसमध्ये आयोजित कार्यक्रमाला भाजपचे विदर्भ संघटनमंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, खा. अशोक नेते, आ. डॉ. देवराव होळी, नगराध्यक्ष योगीता पिपरे, भाजपचे ज्येष्ठ नेते बाबुराव कोहळे, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा महामंत्री रवींद्र ओल्लालरवार, शहर अध्यक्ष सुधाकर येनगंदलवार, स्वप्नील वरघंटे आदी उपस्थित होते.
केंद्र व राज्य शासनाकडून अनेक लोकहिताच्या योजना राबविल्या जात आहेत. त्या योजनांचा लाभ शेतकरी, शेतमजूर व सर्वसामान्य घटकातील नागरिकांना मिळाला पाहिजे. या उदात्त हेतूने पंडित दीनदयाल उपाध्याय जन्मशताब्दीनिमित्त कार्यविस्तार योजना राबविली जात आहे. त्यानुसार जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगर परिषद, नगर पंचायत व विस्तारक म्हणून नियुक्त करण्यात आलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागून पक्षाचे ध्येय धोरण नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे आवाहन डॉ. उपेंद्र कोठेकर यांनी केले. गावातील नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घ्या, असेही ते म्हणाले. यावेळी विविध आघाड्यांचे पदाधिकारी, सदस्य, कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.
देसाईगंज येथील आमदारांच्या जनसंपर्क कार्यालयात पं. दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजनाविषयी आढावा बैठक रविवारी संघटन मंत्री डॉ. उपेंद्र कोठेकर यांचे अध्यक्षतेखाली पार पडली. बैठकीला खा. अशोक नेते, आ. कृष्णा गजबे, जि. प. सभापती नाना नाकाडे जि. प. सदस्य भाग्यवान टेकाम, आळे रोशनी पारधी, खोब्रागडे, नगराध्यक्ष शालू दंडवते, पं. स. सभापती, उपसभापती, सदस्य तसेच जिल्हा व तालुका कार्यकारिणीचे पदाधिकारी उपस्थित होते.
पं. दीनदयाल उपाध्याय कार्यविस्तार योजना माध्यमातून भाडभिडी व विकासपल्ली येथे योजनांची जनजागृती करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य रंजिता कोडापे, दिलीप चलाख, आशिष कोडापे, दिलीप देशमुख व भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
सिरोंचा तालुक्यातील ग्रा. प. आरडा, राजन्नपल्ली, राजेश्वरपल्ली भाजपच्या वतीने विस्तारक अभियान राबविण्यात आले. गावातील प्रत्येक घराला भेट देउन केंद्र व राज्य सरकारच्या योजनांबाबत माहिती देण्यात आली. यावेळी आरडा गावाचे सरपंच रंगु बापु, डॉ. श्रीनिवास अनपर्ती, मनोज रंगुवार डॉ. बोडेंकि, किस्टय्या येर्रोल्ला, अशोक येतम, शकुंतला येतम कार्यकर्ते हजर होते.

Web Title: Public awareness about the schemes of the Center and the state government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.