भ्रष्टाचार निर्मूलनावर जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 2, 2017 11:50 PM2017-11-02T23:50:04+5:302017-11-02T23:50:39+5:30

लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या वतीने जिल्हाभरात दक्षता जनजागृती सप्ताह पाळला जात आहे.

 Public awareness on eradicating corruption | भ्रष्टाचार निर्मूलनावर जनजागृती

भ्रष्टाचार निर्मूलनावर जनजागृती

Next
ठळक मुद्देएसीबीचा उपक्रम : चामोर्शीत कलापथकाद्वारे पथनाट्य

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : लाचलुचपत प्रतिबंधक विभाग गडचिरोलीच्या वतीने जिल्हाभरात दक्षता जनजागृती सप्ताह पाळला जात आहे. या सप्ताहाचा एक भाग म्हणून २ नोव्हेंबर रोजी गुरूवारला चामोर्शी पोलीस ठाण्यात पोलीस पाटलांची भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत कार्यशाळा घेण्यात आली. तसेच चामोर्शी येथील मुख्य मार्गावरील बसस्थानकावर कलापथकाच्या माध्यमातून नागरिकांमध्ये भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत प्रभावीरित्या जनजागृती करण्यात आली.
चामोर्शी तालुका रिक्षा, टॅक्सी, आॅटो चालक-मालक संघटनेशी चर्चा करूनही लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या वतीने भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जनजागृती करण्यात आली. तसेच येथील शासकीय कार्यालये तसेच इतर गर्दीच्या ठिकाणी बॅनर व पोस्टर लावून भ्रष्टाचार निर्मूलनाबाबत जागृती करण्यात आली. याशिवाय गडचिरोली येथील बसस्थानकासमोरही कलापथकाच्या माध्यमातून पथनाट्य सादर करून जनजागृती करण्यात आली. यासाठी लोकमत सखी मंच गडचिरोलीचे महत्त्वपूर्ण सहकार्य लाभले. त्यानंतर आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात नागरिकांना मार्गदर्शनही करण्यात आले. ‘भ्रष्टाचार निर्मूलन’ या विषयावर आयोजित करण्यात आलेल्या रांगोळी स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेतील विजेत्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. लाचलुचपतबाबत गडचिरोलीच्या एसीबी कार्यालयात नागरिकांनी तक्रार नोंदवावी, असे आवाहन एसीबी गडचिरोलीचे पोलीस निरीक्षक एम.एस. टेकाम यांनी केले आहे.

Web Title:  Public awareness on eradicating corruption

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.