पाेलिसांकडून कुरखेडा येथे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:37 AM2021-04-04T04:37:44+5:302021-04-04T04:37:44+5:30
कोविड १९ महामारी नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी पाेलिसांनी शहरातून जनजागृती मार्च काढला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक ...
कोविड १९ महामारी नियंत्रण कार्यक्रमांतर्गत नियमांचे काटेकोर पालन व्हावे, यासाठी पाेलिसांनी शहरातून जनजागृती मार्च काढला. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई केली जाईल, असा इशार याप्रसंगी देण्यात आला. काेराेनाचा संसर्ग वाढत असतानाच, नागरिक नियमांचे पालन करण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. त्यामुळे संसर्ग पुन्हा वाढण्याची शक्यता आहे, ही बाब ओळखून ठाणेदार सुधाकर देडे, पोलीस उपनिरीक्षक नारायण शिंदे यांच्या नेतृत्वात सशस्त्र पोलिसांनी पोलीस स्टेशन, बाजारपेठ ते नवीन बस स्थानकापर्यंत मार्च काढत व्यापारी, नागरिक, तसेच विद्यार्थांशी संवाद साधून जागृती केली. नागरिकांनी अनावश्यक बाहेर पडू नये. आवश्यक कामासाठी बाहेर पडताना नियमित मास्कचा वापर करावा, तसेच शारीरिक अंतराच्या नियमांचे पालन करावे, असे आवाहन याप्रसंगी करण्यात आले. पाेलीस मार्चमध्ये सहायक फौजदार लोमेश पेंदाम, वाहतूक शाखेचे हवालदार विलास शेडमाके, हवालदार उमेश नेवारे, प्रफुल्ल बेहरे, गणेश ठाकूर यांच्यासह पोलीस कर्मचारी सहभागी झाले.