मेळाव्यातून दुर्गम भागात जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 29, 2016 01:37 AM2016-09-29T01:37:19+5:302016-09-29T01:37:19+5:30
जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या
७०० नागरिक उपस्थित : शासकीय योजनांची दिली माहिती
अहेरी : जिल्हा पोलीस अधीक्षक अभिनव देशमुख यांच्या आदेशान्वये अहेरीचे पोलीस निरीक्षक संजय मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस ठाणे अहेरीच्या वतीने दुर्गम रामय्यापेठा येथे मंगळवारी जनजागरण मेळावा घेण्यात आला. विविध शासकीय विभागाच्या कर्मचाऱ्यांनी स्टॉल लावून नागरिकांना शासकीय योजनांची माहिती दिली.
मेळाव्याचे उद्घाटन रामय्यापेठाच्या सरपंच पेंदाम यांच्या हस्ते झाले. अध्यक्षस्थानी पोलीस उपनिरीक्षक कोळेकर होते. प्रमुख अतिथी म्हणून संवर्ग विकास अधिकारी एन. एन. तडस, वनपरिक्षेत्राधिकारी आत्राम, पं. स. कृषी अधिकारी सोनटक्के, कृषी अधिकारी वाघमारे, नायब तहसीलदार गुरनुले, आरोग्य पर्यवेक्षक शिरमवार, सिद्धीकी, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक विश्रोजवार, शेंडे, वसाके आदी मान्यवर उपस्थित होते.
या मेळाव्याच्या अनुषंगाने पोलीस विभागामार्फत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. विजेत्या चमूंना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देऊन सन्मानित करण्यात आले. याप्रसंगी सांस्कृतिक कार्यक्रमही पार पडले. मेळाव्याला रामय्यापेठा, मद्दीगुडम परिसरातील जवळपास ७०० नागरिक उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक पोलीस उपनिरीक्षक धुरट, संचालन संतोष मंथनवार यांनी केले तर आभार महिला पीएसआय तांबुसकर यांनी मानले. यशस्वीतेसाठी पोलीस उपनिरीक्षक बगाटे, पोलीस हवालदार पवार, राठोड, आडे, सल्लावार, टपाले, अर्चना बडा, विमल पदा, शीतल आभारे व इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)