भ्रष्टाचार निर्मूलन समितीतर्फे जनजागृती
By Admin | Published: June 16, 2014 11:30 PM2014-06-16T23:30:50+5:302014-06-16T23:30:50+5:30
भ्रष्टाचार निर्मूलन समिती व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ शाखा गडचिरोलीच्यावतीने जनजागृती कार्यक्रम नुकताच शहरात घेण्यात आला. दरम्यान शहरातील अनेक वार्डातून रॅली काढून नागरिकांमध्ये
गडचिरोली : भ्रष्टाचार निर्मूलन समिती व अखिल भारतीय श्री गुरूदेव सेवा मंडळ शाखा गडचिरोलीच्यावतीने जनजागृती कार्यक्रम नुकताच शहरात घेण्यात आला. दरम्यान शहरातील अनेक वार्डातून रॅली काढून नागरिकांमध्ये भ्रष्टाचाराविरोधी जनजागृती करण्यात आली.
रविवारी सकाळी इंदिरा गांधी चौकातील विश्रामगृहातून जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीची सुरूवात श्री गुरूदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष डॉ. शिवनाथ कुंभारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून करण्यात आली. त्यानंतर शहरातील प्रमुख वार्डातून रॅली फिरवून विश्रामगृहातच समारोप करण्यात आला. त्यानंतर सायंकाळी श्री गुरूदेव सेवा मंडळाच्या मुख्य शाखेत कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी अध्यक्षस्थानी समाजसेवक देवाजी तोफा होते. प्रमुख अतिथी म्हणून खा. अशोक नेते, आ. डॉ. नामदेव उसेंडी, डॉ. शिवनाथ कुंभारे, भुसारी, मनोहर हेपट, सत्यम चकीनारप, रमेश भुरसे, चडगुलवार, पंडीत पुडके, सोनटक्के, विश्वनाथ पेंदाम आदी उपस्थित होते. यावेळी उपस्थित मान्यवरांनीही मार्गदर्शन केले. आजचा युवक अनेक व्यसनांच्या आहारी जात असल्याने व्यसनमुक्त समाज निर्मितीचे आव्हान आहे.
या बरोबरच प्रशासनात भ्रष्टाचाराचे मूळ आणखी खोलवर रूजत असल्याने सामना सामान्य नागरिकांना त्रास होतो, असे प्रतिपादन मान्यवरांनी केले. संचालन विलास निंबोरकर तर आभार पुरूषोत्तम ठाकरे यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)