मेळाव्यातून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 8, 2018 01:16 AM2018-06-08T01:16:25+5:302018-06-08T01:16:25+5:30
पोलीस मदत केंद्र बुर्गीच्या वतीने गावात बुधवारी जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
बुर्गी : पोलीस मदत केंद्र बुर्गीच्या वतीने गावात बुधवारी जनजागरण मेळावा आयोजित करण्यात आला. या मेळाव्यात नागरिकांना शासकीय योजनांची माहिती देण्यात आली. दरम्यान गरीब, गरजूंना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले.
जनजागरण मेळाव्याला बुर्गी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नैताम, ग्रामविकास अधिकारी बोरकुटे, उडेराचे श्रीरामे, उपसरपंच रामा तलांडी, पोलीस पाटील राजू हिचामी, बैसू पुंगाटी, घोसू हिचामी, कांदोळीचे पोलीस पाटील मालू मडावी उपस्थित होते. मेळाव्यादरम्यान पीएसआय चाटे यांनी नागरिकांच्या विविध समस्या जाणून घेतल्या तसेच ‘द्या माहिती, व्हा लखपती’, आत्मसमर्पण योजना याबाबत माहिती दिली. डॉ. नैताम यांनी आरोग्यविषयक मार्गदर्शन केले. दरम्यान मान्यवरांच्या हस्ते साडी, पॅन्ट, शर्ट, विद्यार्थ्यांना नोटबूक, खेळाडूंना व्हॉलिबॉल व नेट वाटप करण्यात आले. यशस्वीतेसाठी प्रभारी अधिकारी पीएसआय पुरूषोत्तम चाटे, संदेश कोठावळे, पीएसआय शिवकुमार बाचावार, राहूल निर्वळ यांच्यासह सीआरपीएफ ९ बटालियन बी कंपनीचे पीएसआय पासवान व कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. या मेळाव्याला पोलीस मदत केंद्राच्या हद्दीतील उडेरा, मरकल, करपनफुंडी, गंडापुरी, कांदोळी, येमली, अबनपल्लीचे नागरिक हजर होते.