कुष्ठरोग निर्मूलनाबाबत रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 3, 2018 01:25 AM2018-10-03T01:25:15+5:302018-10-03T01:25:38+5:30

राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत नर्सिंग स्कूलच्या प्रशिक्षणार्थी तसेच शालेय विद्यार्थी यांच्या वतीने कुष्ठरोग जनजागृती रॅली काढण्यात आली.

Public awareness through rallies to eradicate leprosy | कुष्ठरोग निर्मूलनाबाबत रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

कुष्ठरोग निर्मूलनाबाबत रॅलीच्या माध्यमातून जनजागृती

googlenewsNext
ठळक मुद्देशोधमोहीम : ५०० विद्यार्थी व नागरिकांनी घेतला सहभाग

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रमाअंतर्गत नर्सिंग स्कूलच्या प्रशिक्षणार्थी तसेच शालेय विद्यार्थी यांच्या वतीने कुष्ठरोग जनजागृती रॅली काढण्यात आली.
रॅलीला खा.अशोक नेते, जिल्हा परिषद अध्यक्ष योगीता भांडेकर, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.विजय राठोड यांनी हिरवी झेंडी दिली. यावेळी नगराध्यक्ष योगीता पिपरे, सहायक संचालक (कुष्ठरोग) डॉ.एन.एस.वानखेडे, वैद्यकीय अधिकारी (कुष्ठरोग) डॉ.अमित साळवे, पं.स.उपसभापती विलास दशमुखे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.सचिन हेमके, डॉ.गणेश जैन, डॉ.अप्पलवार, सुधाकर साळवे, कुष्ठरोग पर्यवेक्षक लाटकर, आनंद मोडक आदी उपस्थित होते.
कुष्ठरोग हा जीवाणूपासून होणारा आजार असून तो हवेद्वारे पसरतो. त्याची लागण कुणालाही होऊ शकते. मात्र एमडीडीच्या गोळ्यांनी तो पूर्णपणे बरा होता. मागील चार वर्षांपासून सतत मोहिमेद्वारे कुष्ठरोग शोधून त्यांना औषधोपचाराखाली आणण्याचे कार्य सुरू आहे. कुष्ठरोग्यांना समाजाने वाडीत टाकू नये, असे प्रतिपादन खा.अशोक नेते यांनी केले. कीर्तन, रॅली, चित्ररथ, कलापथक या सर्व माध्यमातून कुष्ठरोगाच्या जनजागृतीचे काम जिल्ह्यात सुरू असून निश्चितच त्यामुळे जास्तीत जास्त कुष्ठरुग्ण शोधून उपचाराखाली आणण्यात आरोग्य विभागाला यश येत आहे. भविष्यात आणखी प्रभावीरित्या जनजागृतीच्या माध्यमातून समाजापर्यंत पोहोचावे, असे प्रतिपादन जि.प.अध्यक्ष योगीता भांडेकर यांनी केले. सीईओ डॉ.विजय राठोड यांनी मार्गदर्शन करताना कुष्ठरुग्णांचा अधिक भार असलेल्या जिल्ह्यांमध्ये गडचिरोली जिल्ह्याचा समावेश आहे. ते शोधून त्यांच्यावर उपचार करण्याचे आवाहन आरोग्य यंत्रणेला केले.
इंदिरा गांधी चौकातून रॅलीला सुरुवात झाली. शहरातील मुख्य मार्गाने रॅली फिरल्यानंतर विश्रामगृहात रॅलीचा समारोप करण्यात आला. रॅलीमध्ये ५०० विद्यार्थी व नागरिक सहभागी झाले होते. घोषवाक्यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. संचालन व प्रास्ताविक डॉ.अमित साळवे यांनी केले तर आभार अवैद्यकीय सहायक आर.एस.पराते यांनी केले. रॅलीमध्ये शासकीय नर्सिंग स्कूल व श्री साई स्कूल आॅफ नर्सिंग, वसंत विद्यालय, गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

Web Title: Public awareness through rallies to eradicate leprosy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Healthआरोग्य