वन व वन्यजीव संरक्षणाची रॅलीतून जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2017 01:06 AM2017-10-05T01:06:54+5:302017-10-05T01:11:27+5:30
वन विभागाच्या वतीने अनेक वन परिक्षेत्रात वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : वन विभागाच्या वतीने अनेक वन परिक्षेत्रात वन्यजीव सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रम घेण्यात आले.
गडचिरोली - तालुक्यातील मारोडा उपक्षेत्रात गांधी जयंतीनिमित्त स्वच्छता मोहीम व वन्यजीव सप्ताह कार्यक्रम घेण्यात आला. वन परिक्षेत्र अधिकारी एन. पी. चांगले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्राम स्वच्छता अभियान राबविण्यात आली. तसेच वन्यजीव सप्ताहानिमित्त रॅली काढण्यात आली. याप्रसंगी जी. व्ही. काळे यांनी स्वच्छता व वन्य जीवांच्या संरक्षणाबाबत मार्गदर्शन केले. वन्यजीव सुरक्षा रॅलीत संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष नन्नावरे, बी. पी. राठोड, ठाकरे, अलोणे, लेकामी, मेश्राम यांच्यासह वनमजूर व कर्मचारी सहभागी झाले.
धानोरा - वन्यजीव सप्ताह व राष्टÑीय रक्तदान दिनानिमित्त वन परिक्षेत्र कार्यालय (उत्तर) यांच्या वतीने रक्तदान, रक्तगट व हिमोग्लाबीन तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात ३० जणांनी रक्तदान केले. तर ४० जणांची रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी करण्यात आली. याप्रसंगी रक्त संक्रमण अधिकारी डॉ. अनंत कन्नाके, सतीश तडकलवार, तंत्रज्ञ अजय ठाकरे, डेविड गुरनुले, श्रीराम गेडाम, डीकेश मेश्राम, बंडू कुमरे उपस्थित होते. यशस्वीतेसाठी वन परिक्षेत्र अधिकारी नितीन हेमके, सहायक बी. बी. येवले, एम. एन. मेश्राम, एन. एच. बन्सोड, के. के. काशिकर, दोडके, सोरते, आत्राम, शेख, कौशल्या मडावी, कोडाप, हेमके, आडे, लोणारकर, मांदाळे, शेंडे, राऊत, विठ्ठल भेंडे, अरविंद वाघाडे, मेश्राम, पिपरे, राऊत, टेकाम यांनी सहकार्य केले. याप्रसंगी नवरगाव, धानोरा, रांगी, राजोली येथील नागरिक उपस्थित होते.
चातगाव - गिधाड संरक्षण व वन संरक्षणाकरिता दौड स्पर्धा घेण्यात आली. सदर स्पर्धा तीन किमी अंतर ठेवण्यात आली. या स्पर्धेत बहुसंख्य स्पर्धेक सहभागी झाले. विजेत्यांना रोख पारितोषिक देण्यात आले. वन परिक्षेत्र अधिकारी पी. सी. सोनडवले यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले. याप्रसंगी पीएसआय जाधव, पीएसआय कन्हेरे, गोडसेलवार, राठोड, राऊत, धात्रक, देठे, आदे उपस्थित होते. दुपारी वन कर्मचाºयांची दुचाकी रॅली खुटगाव, साखेरा, जांभळी, विश्रामपूर, बाम्हणी, अमिर्झा, गिलगावमार्गे काढण्यात आली. तसेच कार्यालय परिसरात स्वच्छता करण्यात आली. याप्रसंगी जि. प. सदस्य राजू जिवानी, पोलीस, सीआरपीएफ जवान व कर्मचारी हजर होते.