विदर्भ आंदोलनाची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2017 12:15 AM2017-11-10T00:15:28+5:302017-11-10T00:15:46+5:30
विदर्भावर होणाºया अन्यायाला वाचा फोडून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी तीव्र लढा उभारण्यात येत आहे. याकरिता विविध आंदोलने केली जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : विदर्भावर होणाºया अन्यायाला वाचा फोडून स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मितीसाठी तीव्र लढा उभारण्यात येत आहे. याकरिता विविध आंदोलने केली जाणार आहे. यासंबंधी चामोर्शी येथे जनजागृती करण्यात आली.
११ डिसेंबरला विधानसभा अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी कडकडीत विदर्भ बंदची हाक दिली असून तत्पूर्वी खा. अशोक नेते यांनी विदर्भासंबंधात दिलेल्या आश्वासनाची आठवण करून देण्यासाठी त्यांच्या निवासस्थानासमोर घंटानाद आंदोलन मोर्चा काढून केले जाणार आहे. तसेच शिवाजी महाविद्यालय गडचिरोली येथे ११ नोव्हेंबरला बेरोजगार युवक, ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर, महिला यांचा महामेळावा घेतला जाईल. या सर्व कार्यक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी केले आहे. गुरूवारी विनोद खोबे यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हा निमंत्रक अरूण मुनघाटे, रंजना मामर्डे, अशोक पोरेड्डीवार, विनोद खोबे, मंदा तुरे, विलास गण्यारपवार, किसनराव शेट्ये, मनमोहन बंडावार, सुरेश कागदेलवार, मोरेश्वर चलकलवार, श्रावण दुधबावरे, चन्नावार, गोसाई सातपुते हजर होते.