एटापल्ली व अहेरीत पाळणार जनता कर्फ्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2020 05:00 AM2020-09-26T05:00:00+5:302020-09-26T05:00:43+5:30
२५ सप्टेंबर रोजी शुक्रवारला जिल्ह्यात नवीन ८५ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ६२ जण कोरोनामुक्त झाले. गडचिरोली शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधित २ हजार ३७५ रूग्णांपैकी १ हजार ७३४ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : अहेरी उपविभागातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने कोरोनाची संसर्ग साखळी तोडण्यासाठी एटापल्ली शहरात २६ सप्टेंबर शनिवारपासून तर अहेरी शहरात २८ सप्टेंबर सोमवारपासून जनता कफ्यू लागू करण्याचा निर्णय दोन्ही शहरातील व्यापारी संघटनांनी घेतला आहे.
अहेरी शहरात सात दिवस तर एटापल्ली शहरात पाच दिवस सर्व दुकाने बंद ठेवण्यात येणार असल्याचा निर्णय बैठकीत घेण्यात आला. एटापल्ली शहरातील जनता कर्फ्यूला नागरिकांनी सहकार्य करावे, असे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष महेश पुल्लुरवार व न.प.चे उपाध्यक्ष रमेश गंपावार यांनी केले आहे.
२५ सप्टेंबर रोजी शुक्रवारला जिल्ह्यात नवीन ८५ कोरोनाबाधितांची नोंद झाली. तर ६२ जण कोरोनामुक्त झाले. गडचिरोली शहरात पॉझिटिव्ह रूग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सद्य:स्थितीत जिल्ह्यातील अॅक्टिव्ह कोरोनाबाधितांची संख्या ६२६ झाली आहे. आतापर्यंत एकूण बाधित २ हजार ३७५ रूग्णांपैकी १ हजार ७३४ जणांनी कोरोनावर यशस्वीरित्या मात केली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत १५ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. अहेरी येथे ५ जण बाधित आढळले. यात शहरात ४ व आलापल्लीला १ जण बाधित आढळला. देसाईगंज तालुक्यात १४ नवीन बाधित आढळले. यात विसोरा १, देसाईगंज शहर ११, कुरूड मधील दोघांचा समावेश आहे. धानोरा तालुक्याच्या येरकड येथील २, आरमोरी शहरातील २ जण बाधित आढळून आले. कोरचीमधील ५ जण यात बोटेकसा २ तर शहरातील ३ जण बाधित मिळाले. कुरखेडा तालुक्याच्या कढोली येथील ६ जण कोरोनाबाधित आढळले. चामोर्शी तालुक्यात ९ जण बाधित आढळले. यात येनापूर १, आष्टी ३, अनखोडा १, मारोडा १ चामोर्शी २ तर वाघदरा १ जण बाधित मिळाला. एटापल्ली शहरातील २ तर भामरागडमधील ५ जण बाधित मिळाले. तसेच मुलचेरा तालुक्याच्या गोविंदपूर येथील १ जण कोरोना बाधित आढळून आला आहे.
अॅक्टीव्ह कोरोनाबाधितांपैकी जिल्ह्यात वेगवेगळ्या तालुक्यातील ६२ जण कोरोनामुक्त झाले. यामध्ये गडचिरोली ३३, आरमोरी २, धानोरा १, वडसा १७, मुलचेरा १, एटापल्ली १ व चामोर्शी तालुक्यातील ७ जणांचा समावेश आहे.
गडचिरोली शहराचा आलेख वाढतीवर
नवीन ८५ बाधितांमध्ये गडचिरोली शहरातील ३४ रूग्णांचा समावेश आहे. यामध्ये आयटीआय चौकाजवळील २, नवेगाव कॉम्प्लेक्स मधील १, जिल्हा परिषद २, सोनापूर कॉम्प्लेक्स १, विवेकानंदनगर १, चामोर्शी रस्ता १, येवली १, सर्वोदय वार्ड २, पोलीस कॉम्प्लेक्स २, गणेश कॉलनी १, अयोध्यानगर १, आरमोरी रस्ता गडचिरोली १, कारगिल चौकाजवळ १, अलंकार टॉकीज मागे १, रेड्डी गोडाऊन १, रामनगर ३, शिवाजी वार्ड १, भगतसिंग वार्ड १, लांजेडा २, कॅम्प एरिया १, गोकुळनगर १, मुरखळा १, वसंत शाळेजवळील एका बाधिताचा समावेश आहे.