जनतेने दादालोरा खिडकीचा लाभ घ्यावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2021 04:28 AM2021-06-04T04:28:17+5:302021-06-04T04:28:17+5:30
पुढे बोलताना जाधव म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारची शासकीय कामे पार पाडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ...
पुढे बोलताना जाधव म्हणाले, ग्रामीण भागातील नागरिकांना विविध प्रकारची शासकीय कामे पार पाडताना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. इकडे-तिकडे भटकावे लागते. त्यामुळे त्यांचा वेळ व पैसे खर्च होतात. तरीही कामे वेळेवर होत नाही. संजय गांधी निराधार योजना, नवीन विहीर खोदकाम, मुख्यमंत्री सौर कृषिपंप योजना, ऑनलाइन सातबारा, काटेरी कुंपण योजना, जातीचा दाखला, शेततळे, नरेगा जाॅब कार्ड, अपंगत्व बस पास सवलत इत्यादी शासकीय कामे एकाच ठिकाणी पार पडावे म्हणून पोलीस स्टेशन धानोरा यांच्यातर्फे दादालोरा खिडकी चालू करण्यात आली आहे. त्याचा नागरिकांनी लाभ घ्यावा, असे जाधव यांनी सांगितले. यावेळी पोलीस निरीक्षक विवेक अहिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अंजली राजपूत, पोलीस उपनिरीक्षक सतीश रेड्डी, सोडेचे माजी सरपंच चंदू किंरगे, रांगीचे पोलीसपाटील रामचंद्र काटेंगे, राकेश कोकोडे, अवि सहारे, सचिन गावतुरे, मोहन काटेंगे, अजय कोकोडे, पंकज गावतुरे व पोलीस कर्मचारी उपस्थित होते.