सार्वजनिक शौचालय व मूत्रीघर झाले बेवारस

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:42 AM2021-09-15T04:42:23+5:302021-09-15T04:42:23+5:30

चामाेर्शी : ‘जहाँ सोच, वही शौचालय’ हा नारा देत ग्रामीण भागात शौचालय व मूत्रीघराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती; ...

Public toilets and urinals became neglected | सार्वजनिक शौचालय व मूत्रीघर झाले बेवारस

सार्वजनिक शौचालय व मूत्रीघर झाले बेवारस

Next

चामाेर्शी : ‘जहाँ सोच, वही शौचालय’ हा नारा देत ग्रामीण भागात शौचालय व मूत्रीघराच्या बांधकामाला सुरुवात करण्यात आली होती; पण चामोर्शी तालुक्यातील अनेक गावांतील नागरिक या शौचालयांचा व मूत्रीघरांचा वापरच करीत नसल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागामध्ये गावे हगणदारीमुक्त करण्यासाठी शौचालय व मूत्रीघर बांधण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्या अनुषंगाने शासनाने बऱ्याच गावी शौचालये व मूत्रीघरे बांधलेली आहेत; पण गावातील लोकांची अजूनपर्यंत पाहिजे त्या पद्धतीने मानसिकता बनली नाही. अनेक स्त्री, पुरुष, लहान बालके उघड्यावरच शौचास व लघवी करण्याकरिता जात असतात. त्यामुळे सार्वजनिक शौचालय व मूत्रीघराचा वापरच गावकरी करीत नसल्याने या इमारती बेवारस स्थितीत दिसून येत आहेत.

ग्रामपंचायत प्रशासनसुद्धा याकडे कानाडोळा करीत असल्याने शासनाचे लाखो रुपये लावून बांधलेल्या इमारती दयनीय अवस्थेत आढळून आल्या आहेत. या इमारतीच्या अवतीभोवती लहान-मोठ्या झाडाझुडपांचे साम्राज्य तयार झाले असून, गावांतील लोक याच ठिकाणी कचरा आणून टाकत असतात. त्यामुळे या परिसरात सर्वत्र कचऱ्यामुळे दुर्गंधी पसरली असते. सध्याची परिस्थिती बघता येणारी दुर्गंधी ही गावांमध्ये रोगराईला निमंत्रण दिल्यासारखी होईल.

Web Title: Public toilets and urinals became neglected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.