जनतेचा अपेक्षाभंग होणार नाही
By admin | Published: November 19, 2014 10:42 PM2014-11-19T22:42:54+5:302014-11-19T22:42:54+5:30
जनतेने ज्या अपक्षेने आपल्याला आमदार म्हणून निवडून दिले आहे, त्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही, असे आश्वासन आमगाव विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम यांनी दिले.
संजय पुराम : सालेकसात जाहीर सत्कार कार्यक्रमात दिली ग्वाही
सालेकसा : जनतेने ज्या अपक्षेने आपल्याला आमदार म्हणून निवडून दिले आहे, त्या अपेक्षांचा भंग होऊ देणार नाही, असे आश्वासन आमगाव विधानसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित आमदार संजय पुराम यांनी दिले. सालेकसा येथे आयोजित जाहीर सत्कार समारंभात ते संबोधित करीत होते.
भारतीय जनता पक्ष सालेकसा तालुका कार्यकारिणीच्या वतीने आ.पुराम यांचा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा भाजपाध्यक्ष विनोद अग्रवाल तर प्रमुख अतिथी म्हणून माजी आमदार व विधानसभा प्रभारी केशव मानकर, माजी आमदार भेरसिंह नागपुरे, राकेश शर्मा, जि.प.च्या महिला व बालकल्याण सभापती सविता पुराम, पं.स. सभापती छाया बल्हारे, तालुका भाजपाध्यक्ष खेमराज लिल्हारे आमगाव, तालुकाध्यक्ष येशुलाल उपराडे, महामंत्री सुभाष आकरे, विरेंद्र अंजनकर, नरेंद्र वाजपेयी व इतर मान्यवर उपस्थित होते.
पुराम पुढे म्हणाले की, आमगाव विधानसभा क्षेत्र अनुसूचित जमातीसाठी राखीव झाल्याने आपल्यासारख्या एका छोट्या शेतकऱ्यांच्या मुलाला आमदार होण्याचे सौभाग्य लाभले. सामान्य गोरगरिबांना लोकांच्या सहवासात राऊन त्यांच्यासोबत काम करीत असल्यामुळे आपल्याला माहित आहेत की त्यांच्या वेदना काय आहेत. त्यामुळे त्यांच्या मनातील अपेक्षा समजून घेणे याला प्रथम प्राधान्य द्यावे लागते. यासाठी वरिष्ठांशी सल्लामसलत घ्यायला मागेपुढे पाहणार नाही. सालेकसा तालुक्यात सर्वाधिक मनाधिक्य दिल्याबद्दल सालेकसा तालुका कार्यकारिणीचे तसेच जेष्ठ नेते राकेश शर्मा आणि त्यांच्या चमुचे आभार मानले.
या प्रसंगी गुणवंत बिसेन, शंकर मडावी, माजी सभापती श्रावण राणा, माजी पं.स. सभापती बाबुलाल उपराडे, जि.प. सदस्य कल्याणी कटरे, प्रेमलता दमाहे, बजरंग दलाचे प्रल्हाद वाढई, बद्रीप्रसाद दसरिया, मनोज इळपाते, रुपा भुरकूडे, मनोज विश्वकर्मा, संगीता सहारे, प्रतिभाा परिहार, मेहतर दमाहे, युवा मोर्चा अध्यक्ष मनोज दमाहे, संदीप डेकाटे, रहांगडाले व पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते.
याप्रसंगी केशव मानकर, भैरसिंग नागपुरे, राकेश शर्मा, उपराडे, परिहार यांनी ही समयोचित मार्गदर्शन केले. प्रास्ताविक तालुकाध्यक्ष खेमराज लिल्हारे यांनी केले. तालुक्यात भाजपच्या कार्यकर्त्यांनी कशा प्रकारे परिश्रम घेतले याचा आढावा सादर केला. कार्यक्रमाचे संचालन महामंत्री परसराम फुंडे यांनी तर आभार उमेदलाल जैतवार यांनी मानले. कार्यक्रमासाठी मुन्ना शर्मा, बाबा दमाहे, राजू बोपचे, अजय वशिष्ठ, यादव नागपूरे, बाबा परिहार, झनक बल्हारे, सुदेश जनबंधु यांनी सहकार्य केले. (प्रतिनिधी)