डाॅक्टरचा विनयभंग करणाऱ्यास शिक्षा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:36 AM2021-01-20T04:36:11+5:302021-01-20T04:36:11+5:30
धानाेरा : रूग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डाॅक्टरचा विनयभंग करणाऱ्या आराेपीला धानाेरा न्यायालयाने दाेन वर्ष दाेन महिन्यांचा कारावास व तीन ...
धानाेरा : रूग्णालयात कर्तव्यावर असलेल्या महिला डाॅक्टरचा विनयभंग करणाऱ्या आराेपीला धानाेरा न्यायालयाने दाेन वर्ष दाेन महिन्यांचा कारावास व तीन हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.आकाश देवराव काटेंगे (२५) असे आराेपीचे नाव आहे. ११ जून २०१९ राेजी आकाशने रूग्णालयात जाऊन कर्तव्यावर असलेल्या महिला डाॅक्टरच्या शासकीय कामात अडथळा निर्माण करीत विनयभंग केला. यावरून तक्रार दाखल करण्यात आली. धानाेरा काेर्टाचे न्याय दंडाधिकारी पांचाेली यांनी या प्रकरणाचा निकाल देताना आराेपीला शिक्षा सुनावली आहे. धानाेरा पाेलीस स्टेशनचे पाेलीस निरिक्षक विवेक अहिरे यांच्या मार्गदर्शनात पाेलीस उपनिरिक्षक सतिष रेड्डी, मदतनिस विनाेद चुनारकर यांनी तपास करून प्रकरण न्यायालयात दाखल केले. काेर्ट पैरवी म्हणून राेशनलाल कहनावत यांनी काम पाहिले.