तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ९ जणांवर दंडात्मक कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 8, 2021 04:33 AM2021-03-08T04:33:48+5:302021-03-08T04:33:48+5:30
गडचिराेली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली व बोरी येथील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ९ पानठेलाधारकांकडून दंड वसूल करण्यात आला. पानठेल्यातून ...
गडचिराेली : अहेरी तालुक्यातील आलापल्ली व बोरी येथील तंबाखूजन्य पदार्थांची विक्री करणाऱ्या ९ पानठेलाधारकांकडून दंड वसूल करण्यात आला. पानठेल्यातून जप्त करण्यात आलेल्या तंबाखूजन्य पदार्थांची होळी करण्यात आली. ही कारवाई अहेरी पोलीस व मुक्तिपथने संयुक्तरित्या केली आहे.
अहेरी पोलीस व मुक्तीपथ तालुका चमूने आलापल्ली शहरातील मुख्य चौक ते सावरकर चौकापर्यंतच्या सर्व पानठेल्यांची तपासणी केली. तपासणीदरम्यान सहा पानठेलाधारकांकडे तंबाखूजन्य पदार्थ आढळून आले. याप्रकरणी ३ हजार ५०० रुपयांचा तंबाखूजन्य पदार्थ जप्त करीत एकूण एक हजार दोनशे रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. तसेच बोरी येथील दोन पानठेले व एका किराणा दुकानातून तंबाखूजन्य पदार्थ जप्त करीत दंडात्मक कारवाई करण्यात आली. पुन्हा तंबाखूजन्य पदार्थांची विक्री न करण्याचे सांगण्यात आले. जप्त करण्यात आलेल्या संपूर्ण मालाची होळी करण्यात आली. यावेळी अहेरीचे एपीआय शिंदे, पीएसआय पाडोळे, पोलीस कर्मचारी सहारे, मेश्राम, यादव मेश्राम, मुक्तिपथ तालुका संघटक केशव चव्हाण सहभागी झाले होते.