महामंडळांकडून १५ कोटींची धान खरेदी
By admin | Published: January 8, 2016 02:01 AM2016-01-08T02:01:03+5:302016-01-08T02:01:03+5:30
आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यातील विविध धान खरेदी केंद्रांवरून ....
जिल्हाभरात ६६ केंद्र सुरू : धानाची आवक वाढली; आणखी नवे केंद्र मंजूर होणार
गडचिरोेली : आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली व अहेरी प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत जिल्ह्यातील विविध धान खरेदी केंद्रांवरून १८ नोव्हेंबर २०१५ ते ६ जानेवारी २०१६ या कालावधीत एकूण १५ कोटी १३ लाख ७९६ रूपयांची धान खरेदी करण्यात आली आहे. तसेच ११ हजार क्विंटल धानाची भरडाईसाठी संबंधित धान खरेदी केंद्रावरून उचल करण्यात आली आहे. महामंडळाच्या वतीने खरेदी केलेल्या धानाच्या भरडाईची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.
महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत आधारभूत खरेदी योजनेंतर्गत जिल्ह्यात ३५ मंजूर केंद्रांपैकी ३१ केंद्र सुरू करण्यात आले आहे. तर याच योजनेंतर्गत अहेरी प्रादेशिक कार्यालयामार्फत संस्थांच्या वतीने मंजूर १६ पैकी १५ धान खरेदी केंद्र सुरू करण्यात आले आहे. गडचिरोली कार्यालयाअंतर्गत ३१ केंद्रांवरून आतापर्यंत संस्थांच्या वतीने ११ कोटी ४५ लाख ३२ हजार ५०९ रूपये किंमतीचे एकूण ८१ हजार २२८.७३ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. अहेरी कार्यालयाअंतर्गत सहकारी संस्थांच्या वतीने १५ केंद्रांवरून २ कोटी २१ लाख १३ हजार १८५ रूपये किंमतीच्या १५ हजार ६८३.११ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. या धान खरेदीसंबंधीत संस्थांनी हुंड्या वटविल्या आहेत. यातून धान विक्री केलेल्या शेतकऱ्यांना एकूण ३ कोटी १७ लाख ५ हजार ५५६ रूपये अदा करण्यात आले आहे. मात्र काही संस्थांकडून हुंड्या वटविण्यात न आल्याने ८ कोटी २८ लाख २६ हजार ९५३ रूपयांचे धानाचे चुकारे प्रलंबित आहेत.
कुरखेडा तालुक्यातील नऊ संस्थांच्या वतीने कुरखेडा, कढोली, नान्ही, गोठणगाव, गेवर्धा, अंधळी, शिरपूर, सोनसरी व मौशी या नऊ केंद्रांवरून आतापर्यंत ३ कोटी ३९ लाख ९० हजार ४३२ रूपये किंमतीचे २४ हजार १०६ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. कोरची तालुक्यातील आठ संस्थांमार्फत आठ केंद्रांवरून २ कोटी २० लाख १३ हजार ९२१ रूपये किंमतीचे १५ हजार ६१२ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. आरमोरी तालुक्यातील आठ संस्थांच्या वतीने आठ केंद्रांवरून २ कोटी ३९ लाख ३८ हजार ६२७ रूपये किंमतीचे १६ हजार ९७७ क्विंटल धान खरेदी झाली आहे. धानोरा तालुक्यात सहा संस्थांच्या सहा केंद्रांना मंजुरी प्रदान करण्यात आली आहे. यापैकी चार केंद्रांवरून १ कोटी ८१ लाख ४३ हजार १४६ रूपये किंमतीच्या १२ हजार ८६७ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. घोट, मक्केपल्ली, रेगडी या तीन केंद्रांवरून १ कोटी ६४ लाख ४६ हजार ३८१ रूपये किंमतीच्या ११ हजार ६६४ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे.
एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाअंतर्गत ३१ केंद्रांवरून आतापर्यंत १ कोटी ४६ लाख ६१ हजार १६९ रूपये किंमतीचे ७ हजार ६७ क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. एकाधिकार खरेदी योजनेंतर्गत कुरखेडा तालुक्यात पाच केंद्रावरून ६ लाख ७२ हजार ६४५ रूपये किंमतीचे ३२०.८९ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. कोरची तालुक्यात एका केंद्रावरून २ लाख ७५ हजार १५९ रूपये किंमतीचे ५३५.३० क्विंटल तर आरमोरी तालुक्यात चार केंद्रांवरून ३१ लाख २५ हजार ९४० रूपये किंमतीचे १५२०.८७ क्विंटल धान खरेदी करण्यात आली आहे. धानोरा तालुक्यातील चार केंद्रांवरून ४२ लाख १३ हजार ८६६ रूपये किंमतीचे २०५३.५७ क्विंटल धान खरेदी आतापर्यंत झाली आहे. (स्थानिक प्रतिनिधी)