सिरोंचाच्या केंद्रावर साडेपाच हजार क्विंटलची धान खरेदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 12, 2021 04:34 AM2021-02-12T04:34:49+5:302021-02-12T04:34:49+5:30
सिरोंचा : आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित सिरोंचा खरेदी केंद्रावर १० फेब्रुवारीपर्यंत एकूण १६१ शेतकऱ्यांचे एकरी ९ क्विंटल ६० ...
सिरोंचा : आदिवासी विविध कार्यकारी संस्था मर्यादित सिरोंचा खरेदी केंद्रावर १० फेब्रुवारीपर्यंत एकूण १६१ शेतकऱ्यांचे एकरी ९ क्विंटल ६० किलो प्रमाणे साडेपाच हजार क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली.
आधारभूत खरेदी योजनेअंतर्गत २३ जानेवारी २०२१ पासून धान खरेदीला प्रारंभ झाला शेतकऱ्यांनी केंद्रावर सातबारासह कागद पत्राची ऑनलाईन नोंदणी केल्यानंतर नोंदणी क्रमाप्रमाणे शेतकऱ्यांना मोबाईलवर मॅसेज जातो. त्या मेसेजच्या माहितीनुसार धान केंद्रावर नेणे आदिवासी विविध कार्यकारी संस्थेला स्वतः चे गोदाम नाही. कृषी उत्पन्न बाजार समितीचे दोन गाेदाम भाडेतत्त्वावर घेऊन बाजार समितीच्या आवारात खरेदी व्यवहार करुन गाेदाममध्ये स्टाक केला जातो. एका गोदामची क्षमता सहा हजार क्विंटल व दुसऱ्या गाेदामची क्षमता पाच हजार क्विंटलची आहे. दुसऱ्या गोदामला समोर शटर्सची व्यवस्था नाही. या केंद्राअंतर्गत १३ गावांचा शेतकऱ्यांचा समावेश असून त्यात सिरोंचा, नगरम, चिंतलपली, रामकृष्णपुर, मंडलापुर, मदिकुंठा, जानमपली, रामांजपूर, नंदीगाव, लक्ष्मीपूर, आदिमुतापुर, तमंदाल, सूर्यापली आदी गावांचा समावेश आहे. खरेदी ३१ मार्चपर्यंत सुरू राहणार आहे.
बाॅक्स ..
खरेदीची मर्यादा वाढविली नाही.
प्रतिएकरी धान खरेदी १६ ते २० क्विंटल करण्याकरिता शेतकऱ्यांनी केलेला चक्का जाम आंदोलन विविध राजकीय पक्षांनी खरेदी मर्यादा वाढीसाठी शासनाला पाठविलेले निवेदने हे सर्व प्रयत्न निष्फळ ठरले. शासन आपल्या निर्णयावर ठाम राहिले अखेर शेतकऱ्यांना शासन निर्णयानुसारच धान विक्री करावा लागत आहे.
उर्वरित धान खाजगी व्यापाऱ्यांना विकण्याशिवाय पर्याय नाही. ज्या शेतकऱ्यांचा शेतात एकरी १५ ते २० क्विंटल उत्पादन झाले आहे, अशा शेतकऱ्यांना आपले उर्वरित धान खाजगी व्यापाऱ्यांना विक्री केल्याशिवाय पर्याय नाही.