यावर्षी होणार विक्रमी धान खरेदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 14, 2019 10:42 PM2019-01-14T22:42:44+5:302019-01-14T22:43:10+5:30

आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जिल्हाभरातील ८५ धान खरेदी केंद्रांवरून ८० कोटी ८६ लाख ५ हजार ४७२ रूपये किमतीच्या ४ लाख ६२ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात महामंडळाची धान खरेदी सव्वातीन लाख क्विंटलच्या आसपास होती.

Purchase record of this year will be | यावर्षी होणार विक्रमी धान खरेदी

यावर्षी होणार विक्रमी धान खरेदी

Next
ठळक मुद्देगतवर्षीच्या तुलनेत वाढ : ८५ केंद्रांवर ४ लाख ६२ हजार क्विंटल धानाची आवक

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने आदिवासी विविध कार्यकारी संस्थांमार्फत यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत जिल्हाभरातील ८५ धान खरेदी केंद्रांवरून ८० कोटी ८६ लाख ५ हजार ४७२ रूपये किमतीच्या ४ लाख ६२ हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. गतवर्षी जानेवारी महिन्यात महामंडळाची धान खरेदी सव्वातीन लाख क्विंटलच्या आसपास होती. गतवर्षीच्या तुलनेत यंदा महामंडळाची धान खरेदी वाढली असून यावर्षी आतापर्यंतच्या धान खरेदीचे रेकॉर्ड मोडणारी सर्वाधिक खरेदी होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आदिवासी विकास महामंडळाच्या वतीने सन २०१८-१९ या खरीप हंगामात आधारभूत खरेदी योजनेतर्गत ‘अ’ प्रतीच्या धानाला प्रतीक्विंटल १ हजार ७७० रुपये तर साधारण प्रतीच्या धानाला १ हजार ७५० रुपये हमीभाव मंजूर करण्यात आला आहे. मात्र आवक नसल्याने महामंडळाच्या एकाही केंद्रावर अद्यापर्यंत ‘अ’ प्रतीच्या धानाची खरेदी झाली नाही. सर्वच केंद्रांवर साधारण प्रतीच्या धानाचीच खरेदी महामंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.
महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालयांतर्गत कुरखेडा, कोरची, आरमोरी, धानोरा व घोट या उपप्रादेशिक कार्यालयाच्या हद्दीतील एकूण ५० केंद्रांवर १० जानेवारीपर्यंत ३ लाख ५१ हजार २९ क्विंटल इतक्या धानाची खरेदी झाली आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयांतर्गत असलेल्या ३५ केंद्रांवरून आतापर्यंत १ लाख ११ हजार ३० क्विंटल धानाची खरेदी झाली. अनेक संस्थांचे गोदाम फुल्ल झाले आहेत.
५१.९ कोटींचे चुकारे प्रलंबित
गडचिरोली प्रादेशिक कार्यालयाच्या वतीने शेतकऱ्यांना २४ कोटी ८८ लाख ३३ हजार ६९० रूपयांचे धान चुकारे अदा करण्यात आले आहेत. अद्यापही ३६ कोटी ५४ लाख ६८ हजार २६७ रूपयांचे धान चुकारे प्रलंबित आहे. अहेरी उपप्रादेशिक कार्यालयाच्या वतीने ४ कोटी ८७ लाख ८३ हजार २८० रुपयांचे चुकारे अदा करण्यात आले आहेत. अद्यापही १४ कोटी ५५ लाख २० हजार २३५ रुपयांचे धान चुकारे शिल्लक आहे. गडचिरोली व अहेरी दोन्ही कार्यालय मिळून जिल्हाभरात ९ हजार ९२७ शेतकºयांच्या चुकाºयापोटी ५१ कोटी ९ लाख ८८ हजार ५०२ रुपयांची रक्कम अदा करणे शिल्लक आहे.
६० हजार क्विंटल धान भरडाईसाठी पाठविले
यंदाच्या खरीप हंगामात आदिवासी विकास महामंडळाच्या गडचिरोली प्रादेशिक कार्यालय, अहेरी उपप्रादेशिक कार्यालय तसेच जिल्हा मार्केटींग अधिकारी गडचिरोलीच्या वतीने जानेवारी महिन्याच्या दुसºया आठवड्यापर्यंत केंद्रावरून एकूण ६० हजार २९२ क्विंटल इतके धान भरडाईसाठी मान्यताप्राप्त मिलमध्ये पाठविण्यात आले आहे. महामंडळाच्या गडचिरोली कार्यालयांतर्गत ९७ हजार ९४२ क्विंटल तर जिल्हा मार्केटींग अधिकारी कार्यालयांमार्फत २ हजार ३५० क्विंटल धान भरडाईसाठी पाठविण्यात आली आहे. धान खरेदी करणाºया अभिकर्ता संस्थेकडे ४ लाख ८९ हजार २३४ क्विंटल धान शिल्लक आहेत.

Web Title: Purchase record of this year will be

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.