धानाची उचल न झाल्याने खरेदी ठप्प
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:09 AM2021-03-04T05:09:12+5:302021-03-04T05:09:12+5:30
धानोरा येथे आदिवासी विकास सोसायटी मार्फत धान खरेदी केली जाते. येथील शासकीय गाेदामामध्ये धानाची खरेदी केली जाते. डिसेंबर महिन्यापासून ...
धानोरा येथे आदिवासी विकास सोसायटी मार्फत धान खरेदी केली जाते. येथील शासकीय गाेदामामध्ये धानाची खरेदी केली जाते. डिसेंबर महिन्यापासून खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. ज्या प्रमाणात खरेदी करण्यात आली. त्या तुलनेत धानाची उचल न झाल्याने काही दिवसातच गाेदाम फुल्ल झाले. त्यामुळे काही धान ताडपत्री झाकून ठेवण्यात आले आहे. बाहेर ठेवलेले धान पावसामुळे भिजण्याचा धाेका असल्याने १ मार्चपासून धान खरेदी बंद करण्यात आली आहे. २८ फेब्रुवारीपर्यंत या केंद्रावर ७ हजार ४५८ क्विंटल धानाची खरेदी करण्यात आली आहे. अनेक शेतकऱ्यांनी आपले धान खरेदी केंद्राच्या आवारात आणून ठेवले आहे. अनेक शेतकऱ्यांचा ऑनलाइन नंबर लागणे बाकी आहे. २५ मार्चपर्यंत धान खरेदीची मुदत आहे. त्यामुळे आपला नंबर लागून धानाची विक्री व्हावी याकरिता शेतकरी आतुरतेने वाट पाहत आहे. तालुक्यातील अनेक केंद्रावर हीच परिस्थिती आहे वरिष्ठ अधिकाऱ्यांनीऱ्यांनी याकडे लक्ष देऊन मालाची उचल करण्यात यावे अशी मागणी होत आहे.