पुसला समाजाची कार्यकारिणी गठित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2021 04:40 AM2021-09-22T04:40:25+5:302021-09-22T04:40:25+5:30
गुड्डीगुडम : पुसाला समाजाचा मुख्य व्यवसाय बांगड्या, मनेरी विकणे होय. आदिवासी भागात, खेड्यावर, पाड्यावर फिरत बांगड्या, मनेरी साहित्य, लहान ...
गुड्डीगुडम : पुसाला समाजाचा मुख्य व्यवसाय बांगड्या, मनेरी विकणे होय. आदिवासी भागात, खेड्यावर, पाड्यावर फिरत बांगड्या, मनेरी साहित्य, लहान मुलांच्या खेळण्या विक्री करून हा समाज आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो; परंतु गावागावांत जनरल दुकाने झाल्याने या समाजाचा धंदा मोडकळीस आलेला आहे. या समाजाच्या समस्या शासन दरबारी पोहोचण्यासाठी एकतेची, समाज संघटनेची गरज आहे, ही बाब विचारात घेऊन निमलगुडम येथे २० सप्टेंबर रोजी समाजाची सभा आयोजित करून कार्यकारिणी गठित करण्यात आली.
पुसाला समाज संघटनेचे अध्यक्ष म्हणून नागेश शिरलावार, उपाध्यक्ष गंगाधर नाईनवार, लक्ष्मण गुंडलावार, सचिव नीलेश नाईनवार, सहसचिव रामू आऊलवार, कोषाध्यक्ष नर्सय्या मुद्रकोलावार, महिला प्रमुख बुचव्वा मुद्रकोलावार, सदस्य म्हणून बालेश मुद्रकोलावार, ईश्वर नाईनवार, किशोर शिरलावार, व्यंकटेश शिरलावार यांची निवड करण्यात आली आहे.
सदर संघटनेच्या वतीने समाजाचे आर्थिक, शैक्षणिक, राजकीय, सामाजिक विषयावर सकारात्मक चर्चा करून समाजाच्या एकतेसाठी कार्यक्रम आयोजित करणे, समाजाच्या समस्या शासन दरबारी मांडणे, समाजातील अनेक समस्या घेऊन चर्चा करण्यात आली. सभेचे संचालन नीलेश नाईनवार यांनी केले, तर आभार रामू आऊलवार यांनी मानले. अहेरी, सिरोंचा, भामरागड तालुक्यातील पुसाला समाजबांधव, तसेच महिला व पुरुषांची उपस्थिती होती.