खरेदी-विक्री संमेलनात ७६ शेतमालाचे नमुने ठेवले

By admin | Published: April 14, 2017 01:17 AM2017-04-14T01:17:28+5:302017-04-14T01:17:28+5:30

महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय खरेदीदार, विक्रेते यांचे संमेलन गडचिरोली येथे पार पडले.

Put samples of 76 pieces in the marketing convention | खरेदी-विक्री संमेलनात ७६ शेतमालाचे नमुने ठेवले

खरेदी-विक्री संमेलनात ७६ शेतमालाचे नमुने ठेवले

Next

गडचिरोली : महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत जिल्हास्तरीय खरेदीदार, विक्रेते यांचे संमेलन गडचिरोली येथे पार पडले. या संमेलनात ७६ शेतमालाचे नमुने शेतकऱ्यांनी विक्रीसाठी ठेवले होते.
जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक यांच्या निर्देशानुसार संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. या संमेलनाला प्रमुख मार्गदर्शक म्हणून अमिताभ पावडे उपस्थित होते. प्रमुख अतिथी म्हणून आत्माचे संचालक डॉ. प्रकाश पवार, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनंत पोटे, उपसंचालक डॉ. अर्चना कडू, विभागीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रज्ञा गोळघाटे, प्रिती हिरळकर, बलराम बलगमवार, हेमंत गडपायले, तांबे, पठाण, अनिल म्हशाखेत्री, डॉ. मुनघाटे, जीवन चौधरी उपस्थित होते. खरेदीदारांनी शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा केली. २० व्यापाऱ्यांनी उत्पादनाची माहिती ई-मेलद्वारे मागितली. यावेळी घडी पत्रिकेचे विमोचन करण्यात आले. कार्यक्रमाचे आयोजन कृषी पणन तज्ज्ञ प्रशांत ढवळे, श्रीकांत कापगते, जयश्री गुरूकर यांनी केले. (नगर प्रतिनिधी)

Web Title: Put samples of 76 pieces in the marketing convention

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.