सव्वा लाख क्विंटल धान उघड्यावर पडून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 6, 2021 04:27 AM2021-06-06T04:27:36+5:302021-06-06T04:27:36+5:30
घाेट आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत २०२०-२१ च्या हंगामात आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात धान खरेदी झाली. संस्थेच्या ...
घाेट आदिवासी विविध कार्यकारी सहकारी संस्थेमार्फत २०२०-२१ च्या हंगामात आधारभूत धान खरेदी योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणात धान खरेदी झाली. संस्थेच्या घोट, मकेपल्ली, रेगडी, गुंडापल्ली, भाडभिडी, सोनापूर, आमगाव, मार्कंडा (कं) १, मार्कंडा (कं) २, पावीमुरांडा, गिलगाव आदी दहा केंद्रांवरून धान खरेदी झाली. यातील गुंडापल्ली, भाडभिडी, सोनापूर, गिलगाव या चार केंद्रांवर गोदाम नसल्याने १०० टक्के धान उघड्यावर खरेदी करण्यात आले. संपूर्ण दहा खरेदी केंद्रावर १ लाख ८१ हजार ६१३.५० क्विंटल एकूण धान खरेदी करण्यात आली. यापैकी १ लाख २८ हजार २८४.५७ क्विंटल धान उघड्यावर पडून आहे, तर आतापर्यंत ९ हजार ९९८.०३ क्विं. धान भरडाईसाठी पाठविण्यात आले आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली आहे. मान्सूनचे आगमन झाल्यानंतर उघड्यावरील धान पावसाने खराब हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही.
===Photopath===
050621\05gad_2_05062021_30.jpg
===Caption===
घाेट येथील केंद्रावर माेकळ्या जागेत झाकून ठेवलेले धान.