सामाजिक बांधिलकी जोपासत रक्तदानासाठी रांग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2021 05:00 AM2021-07-03T05:00:00+5:302021-07-03T05:00:10+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, राज्याचे माजी आरोग्य व उद्योगमंत्री तथा ‘लाेकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : ज्येष्ठ स्वातंत्र्यसंग्राम सेनानी, राज्याचे माजी आरोग्य व उद्योगमंत्री तथा ‘लाेकमत’चे संस्थापक-संपादक जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबूजी यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त शुक्रवारी गडचिरोलीत आयोजित रक्तदान शिबिरासाठी विविध क्षेत्रांतील नागरिकांसह पोलीस जवानांनी उत्साहाने सहभागी होऊन सामाजिक बांधीलकीचा परिचय दिला.
काॅम्प्लेक्समधील पाेलीस रुग्णालयात झालेल्या या शिबिराच्या उद्घाटनपर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा पाेलीस अधीक्षक अंकित गाेयल, तर प्रमुख अतिथी म्हणून अपर पाेलीस अधीक्षक मनीष कलवानिया, अ. पोलीस अधीक्षक समीर शेख, जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. अनिल रुडे, सीआरपीएफच्या १९२ बटालियनचे कमाडिंग ऑफिसर जियाऊ सिंह, द्वितीय कमांडिंग ऑफिसर प्रभात गौतम व दीपक शाहू आणि उपकमाडंट सपन सुमन व संध्या राणी, आदी अधिकारी गण प्रामुख्याने उपस्थित होते. त्यांनी बाबूजींच्या प्रतिमेचे पूजन आणि दीप प्रज्वलन केले. त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी मार्गदर्शन केले.
यावेळी ५३ नागरिकांनी रक्तदान केले. काही रक्तदात्यांना येण्यास उशीर झाल्याने त्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात रक्तदानासाठी पाठविण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ‘लाेकमत’चे कार्यालय प्रमुख डाॅ. गणेश जैन यांनी, तर जिल्हा प्रतिनिधी मनाेज ताजने यांनी सूत्रसंचालन केले. मार्गदर्शन कार्यक्रमानंतर प्रत्यक्ष रक्तदानाला सुरुवात झाली.
या कार्यक्रमासाठी पाेलीस उपअधीक्षक (गृह) अरविंदकुमार कतलाम, पाेलीस कल्याण शाखेचे निरिक्षक नागनाथ सूर्यवंशी, लोकमत इव्हेंट संयोजिका रश्मी आखाडे, जिल्हा सामान्य रूग्णालयाच्या डाॅ. अंजली साखरे, रक्तपेढीचे जनसंपर्क अधिकारी सतीश तडकलावार, नरेश तन्नपुरीवार, विवेक गाेनाडे, सुरेश चांदेकर, लाेकमत समाचारचे हरीश सिडाम, लाेकमतचे दिगांबर जवादे, दिलीप दहेलकर, गोपाल लाजूरकर, विकास चौधरी, विवेक कारेमोरे, श्रीरंग कस्तुरे, निखिल जरूरकर, प्रज्वल दुर्गे, तसेच लोकमत सखी मंचच्या सोनिया बैस, नलिनी बोरकर, विभा उमरे, अंजली वैरागडवार, रोहिनी मेश्राम, मृणाल उरकुडे, वंदना दरेकर आदींनी सहकार्य केले.