धानाचे उत्पादन घटणार रबीचे वाढण्याची शक्यता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 4, 2017 10:15 PM2017-11-04T22:15:07+5:302017-11-04T22:15:57+5:30

हवामानात प्रचंड तापमान वाढीचा फटका धान पिकाला बसला असून विपरित वातावरण बदलामुळे अनेक भागात धानाचे लोंब लालसर पडून लोंबाच्या टोकाला काळपट, पोचट, दाणे आलेले आहे.

Rabi production likely to decline | धानाचे उत्पादन घटणार रबीचे वाढण्याची शक्यता

धानाचे उत्पादन घटणार रबीचे वाढण्याची शक्यता

Next
ठळक मुद्देवातावरणाचा परिणाम : तालुका कृषी विभागाची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : हवामानात प्रचंड तापमान वाढीचा फटका धान पिकाला बसला असून विपरित वातावरण बदलामुळे अनेक भागात धानाचे लोंब लालसर पडून लोंबाच्या टोकाला काळपट, पोचट, दाणे आलेले आहे. तुडतुड्याचा प्रचंड प्रादुर्भाव धान पिकावर झाल्याने यंदा धानाचे उत्पादन घटणार आहे. परंतु आत्तापासूनच थंडीला जोर धरल्याने रबी पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे, अशी माहिती आरमोरीचे तालुका कृषी अधिकारी एस. पी. ढोणे यांनी लोकमतला दिली.
वैरागड येथील एका शेतातील धान पिकाची पाहणी करण्यासाठी तालुका कृषी अधिकारी एस. पी. ढोणे, कृषी अधिकारी एल. ए. कटरे, कृषी पर्यवेक्षक जी. एन. जाधवर आले होते. ते पुढे म्हणाले, वृक्षांची बेसुमार कत्तल झाल्याने जागतिक तापमान वाढ झाली. हवामान बदलामुळे खरीपाच्या पिकांवर रोगांचा प्रचंड प्रादुर्भाव झाला. ढगाळ वातावरण अवेळी पाऊस अशी स्थिती यावर्षी राहिली. पूर्वी नोव्हेंबर ते फेब्रुवारी चार महिने थंडी असायची. या वर्षात नोव्हेंबरच्या प्रारंभापासूनच थंडी पडण्यास सुरूवात झाली असल्याने रबी हंगामातील तूर, उळीद, मूग, जवस, सूर्यफूल व अन्य कडधान्य पिकाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता आहे. शेतकºयांनी केवळ धानाचे पीक घेण्याऐवजी गहू, ज्वारी, हरभरा असे पीक घ्यावे, अधिक नफा मिळवावा, असेही कृषी अधिकाºयांनी सांगितले.

Web Title: Rabi production likely to decline

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.