ओलाव्याअभावी रबीच्या पेरण्या खोळंबल्या

By admin | Published: November 11, 2014 10:39 PM2014-11-11T22:39:56+5:302014-11-11T22:39:56+5:30

मागील दोन महिन्यांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रबीच्या पेरण्या रखडल्या असून ५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ७.९ टक्केच पेरण्या झाल्या आहेत.

Rabi sowing can be avoided due to lack of moisture | ओलाव्याअभावी रबीच्या पेरण्या खोळंबल्या

ओलाव्याअभावी रबीच्या पेरण्या खोळंबल्या

Next

गडचिरोली : मागील दोन महिन्यांपासून पाऊस गायब झाला आहे. त्यामुळे जमिनीतील ओलावा कमी झाल्याने रबीच्या पेरण्या रखडल्या असून ५ नोव्हेंबरपर्यंत केवळ ७.९ टक्केच पेरण्या झाल्या आहेत. पेरणीसाठी शेतकरीवर्ग पावसाची प्रतीक्षा करीत आहे.
गडचिरोली जिल्ह्यात खरीप हंगामात प्रमुख पीक म्हणून धानाचे उत्पादन घेतले जाते. मात्र ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा नाही. असे शेतकरी रब्बी हंगामात ज्वारी, गहू, मका, हरभरा, लाखोळी, मुग, मसुर, तुर, पोपट, उडीद, वाटाणा, वाल, बरबटी, कुरता आदी पिकांचे उत्पादन घेतले जातात. ही सर्व पिके अत्यंत कमी पाण्यात होत असल्याने या पिकांसाठी स्वतंत्र जलसिंचनाची आवश्यकता भासत नाही. परिणामी शेतकरी या पिकांचे उत्पादन कोरडवाहू शेतीत घेतात. सिंचनाची आवश्यकता नसली तरी बियाणे उगविण्यासाठी जमिनीमध्ये काही प्रमाणात ओलावा असणे आवश्यक आहे. रब्बी हंगामासाठी शेत तयार करण्याच्या कामाला आॅक्टोबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासूनच सुरूवात होते. मात्र यावर्षी पावसाने सप्टेंबर महिन्यापासूनच कायमची हुलकावनी दिली. त्यामुळे जमिनीत पाहिजे त्या प्रमाणात ओलावाच नसल्याचे शेतकऱ्यांच्या लक्षात आल्यानंतर शेतकऱ्यांनी पेरण्या थांबवून पावसाची प्रतीक्षा सुरू केली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. अशा शेतकऱ्यांनी मात्र पेरणी केली आहे.
कृषी विभागाने यावर्षी ४० हजार ५७० हेक्टर क्षेत्रावर रब्बी पिकाची लागवड करण्याचे नियोजन केले आहे. त्यानुसार शेतकऱ्यांना आवश्यक असलेली संकरित बि- बियाणे, खते तसेच किटकनाशके उपलब्ध करून दिली आहेत. नियोजनाच्या एकुण क्षेत्रापैकी केवळ २ हजार ८७६ हेक्टरवर ५ नोव्हेंबरपर्यंत पेरणी झाली आहे. जमिनीत ओलावा नसल्याने बियाणे उगवणार नाही. या भीतीपोटी शेतकरी पेरणी करण्यास धजावत नसल्याचे कृषी विभागाच्या अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
रब्बी हंकामामध्ये जवळपास २० टक्के वाटा लाखोळी पिकाचा आहे. लाखोळीचे पीक धानपिक निघण्याच्या पंधरा दिवसांपूर्वी टाकल्या जाते. जड धान निघण्यास अजुन पंधरा ते वीस दिवसांचा कालावधी शिल्लक आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी लाखोळीची पेरणी अजुनपर्यंत केली नाही. केवळ मध्यम धानाच्या क्षेत्रात लाखोळीची लागवड करण्यात आली आहे. मुग, मसुर, तुर, पोपट, उळीद, वाटाणा, बरबटी, कुरता या कडधान्य पिकांची पेरणीसाठी कृषी विभागाने २९ हजार ३४० हेक्टरचे नियोजन केले होते. प्रत्यक्षात मात्र १ हजार ४२९.८ हेक्टरवरच पेरणी झाली आहे. तर ज्वारी पिकाची पेरणीही केवळ ३३९ हेक्टरवर झाली आहे.

Web Title: Rabi sowing can be avoided due to lack of moisture

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.