रानगवा व चितळाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 30, 2019 10:00 PM2019-06-30T22:00:57+5:302019-06-30T22:01:09+5:30

वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानगवा व चितळाला गावठी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून त्यांना जंगलात सुरक्षित सोडले. सदर घटना शनिवारी सकाळी आलापल्ली गावाजवळ घडली.

Ragawa and Chitala alive | रानगवा व चितळाला जीवदान

रानगवा व चितळाला जीवदान

Next
ठळक मुद्देजंगलात सोडले : कुत्र्यांच्या तावडीतून वाचविले

लोकमत न्यूज नेटवर्क
आलापल्ली : वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रानगवा व चितळाला गावठी कुत्र्यांच्या तावडीतून सोडवून त्यांना जंगलात सुरक्षित सोडले. सदर घटना शनिवारी सकाळी आलापल्ली गावाजवळ घडली.
मादी रानगवा व चितळ अन्न व पाण्याच्या शोधात आलापल्ली गावाजवळ आले. गावठी कुत्र्यांनी त्यांचा पाठलाग करण्यास सुरूवात केली. ही बाब आलापल्ली येथील नागरिकांनी वनविभागाच्या अधिकाऱ्यांना दिली. आलापल्ली, अहेरी परिक्षेत्र व वन्यजीव संरक्षण पथकामधील वनकर्मचाºयांच्या दोन टिम तयार करण्यात आल्या. काही वेळातच चितळ व रानगवा यांना पकडण्यात आले. नागेपल्ली येथील पशु रूग्णालयात त्यांच्यावर उपचार करून त्यांना जंगलात सोडण्यात आले.
सदर कार्यवाही आलापल्ली वनविभागाचे उपवनसंरक्षक चंद्रकांत तांबे यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय वनाधिकारी नितेश देवगडे यांच्या नेतृत्त्वात वनपरिक्षेत्र अधिकारी सत्यनारायण आत्राम, आलापल्लीचे क्षेत्र सहाय्यक योगेश शेरेकर, वनपाल सदानंद बावणे, सचिन धात्रक, वनरक्षक प्रदीप गेडाम, दयानंद चिव्हाणे, वनमजूर बंडू रामगीरकर, कांबळे, मलगाम, श्रीनिवास गंजीवार, इस्माईल शेख, रूपेश बोरेवार यांनी पार पाडली.

Web Title: Ragawa and Chitala alive

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.