आरमोरी तालुक्यातील दारू विक्रेत्यांवर धाडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2020 05:00 AM2020-06-01T05:00:00+5:302020-06-01T05:01:21+5:30
आरमोरी शहरातील बर्डी येथील रेशमा विनोद साखरे हिच्या घराची ३० मे रोजी तपासणी केली असता, तिच्या घरी सात लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. ३० मे रोजीच ठाणेगाव येथील किसन मादगू मेश्राम याच्या घरून १० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. या दारूची किंमत दोन हजार रुपये एवढी आहे. इंजेवारी येथील मोरेश्वर कुसन कुमरे याच्या घरून १० लिटर किंमतीची दारू जप्त केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
आरमोरी : स्थानिक पोलिसांनी ३० मे रोजी एकाच दिवशी आरमोरी व तालुक्यातील इतर गावांमधील दारू विक्रेत्यांवर धाडी टाकून दारू व मोहफुलाची दारू काढण्याचे साहित्य जप्त केले आहे.
आरमोरी शहरातील बर्डी येथील रेशमा विनोद साखरे हिच्या घराची ३० मे रोजी तपासणी केली असता, तिच्या घरी सात लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. ३० मे रोजीच ठाणेगाव येथील किसन मादगू मेश्राम याच्या घरून १० लिटर मोहफुलाची दारू जप्त केली. या दारूची किंमत दोन हजार रुपये एवढी आहे. इंजेवारी येथील मोरेश्वर कुसन कुमरे याच्या घरून १० लिटर किंमतीची दारू जप्त केली आहे. आरमोरी ते रामाळा मार्गावर पोलिसांनी सापळा रचला. या मार्गाने येणारे चारचाकी वाहन थांबवून चौकशी केली असता, वाहनात १८० लिटर मोहफुलाची दारू आढळून आली. या प्रकरणी आरमोरी येथील विनोद भाऊराव निकुरे (३८), शैलेश बाळकृष्ण शेंडे (३५), अंकित विठ्ठल खरवडे (२१), राहूल प्रदीप भैसारे (२०) या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच ज्या चारचाकी वाहनातून दारूची वाहतूक केली जात होती, सदर वाहन सुध्दा जप्त केले आहे.
नाकेबंदीमुळे मोहफुलाच्या दारूची मागणी वाढली
विशेष म्हणजे, आरमोरी पोलिसांनी वेगवेगळ्या ठिकाणी सापळे रचून एकाच दिवशी चार कारवाया केल्या आहेत. लॉकडाऊनमुळे ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. त्यामुळे बाहेर जिल्ह्यातून येणारी दारू बंद झाली असल्याने मोहफुलाच्या दारूची मागणी वाढली असल्याने दारू काढण्याचे प्रमाणही वाढले आहे. आरमोरी पोलिसांनी केलेल्या कारवाईमुळे दारू विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.